Abdul Sattar News : निराधारांची दिवाळी गोड होणार, खात्यात अनुदान जमा...

Sillod-Soygaon News : लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करताना पिळवणूक होऊ नये, यासाठी तहसीलदार यांनी खबरदारी घ्यावी.
Abdul Sattar News
Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Shivsena News) राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ अशा निराधार योजनेच्या २४ हजार १३१ लाभार्थ्यांच्या खात्यात ८ कोटी २० लाख रुपये अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Abdul Sattar News
MP Imtiaz Jaleel News : आदर्शच्या कर्जदारांची जप्त मालमत्ता खरेदीचा निर्णय सहकार आयुक्त घेणार का ?..

दिवाळीपूर्वीच निराधारांना मानधन मिळेल, असे आश्वासन सत्तार (Abdul Sattar) यांनी दिले होते. विविध बँकेत सदरील अनुदानाचे वाटप सुरू झाल्याने निराधारांना मोठा दिलासा मिळाला आहे. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचे धनादेश प्रशासनाच्या वतीने बँकांना पाठविण्यात आले आहेत. (Shivsena) लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई, अडवणूक, पिळवणूक होऊ नये, यासाठी दोन्ही तालुक्यांतील तहसीलदार यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना सत्तार यांनी दिल्या आहेत.

बँकांनी निराधारांना तातडीने अनुदान कसे वाटप होईल, यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. निराधारांना त्यांचा हक्क मिळावा, यासाठी तहसील कार्यालयात नियमित बैठका होत आहे. (Marathwada) निराधार योजनेसंबंधी लवकरच पुन्हा बैठक होणार असल्याने निराधार योजनेचा लाभ मिळाला नाही अशा वयोवृद्ध व निराधार नागरिकांनी त्वरित तहसील कार्यालयात संचिका दाखल कराव्यात, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

सिल्लोड तालुक्यात १५ हजार २८९ लाभार्थी असून, त्यांच्या खात्यात साडेसहा कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. सोयगाव तालुक्यात ८ हजार ८४२ लाभार्थी असून, त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी १ कोटी ६८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा धनादेश महसूल प्रशासनाने बँकांना दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आधी कृषी आणि आता पणन व अल्पसंख्याक खात्याचे मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात निधी खेचून आणण्यात आघाडी घेतली आहे.

इतर कुठल्याही मंत्र्यापेक्षा अधिकचा निधी, योजना, प्रकल्प सत्तार यांनी मंजूर करून आणले आहेत. विधानसभा निवडणुका वर्षभरावर आल्यामुळे सत्तार अधिकाधिक निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सत्तार यांच्यावर मेहरबान असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. वर्षभरात सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासाठी शिंदेंनी जणू तिजोरीच खुली केल्याचे चित्र आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com