Abdul Sattar News : शेतकऱ्यांनो धीर धरा, मुख्यमंत्री लवकरच मदत जाहीर करतील..

Farmers : या संपाचा फटका देखील नुकसानीचे पंचनामे करण्यावर होत आहे.
Minister Abdul Sattar Visit Affected Farm
Minister Abdul Sattar Visit Affected FarmSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे आहे, तेव्हा हताश, निराश होवू नका, धीर धरा असे आवाहन कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आहे. जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी सत्तार गेले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना सरकारकडून लवकरच मदत दिली जाईल असे आश्वासन दिले.

Minister Abdul Sattar Visit Affected Farm
Old Pension Protest News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपातही `पन्नास खोके, एकदम ओक्के` च्या घोषणा..

जालना (Jalna) जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आज सत्तार यांनी पाहणी केली. (Affected Farmers) झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा.

अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील, असे सत्तार म्हणाले. अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्यामुळे नुकसान झालेल्या गव्हाच्या पिकाची पाहणी सत्तार यांनी केली.

राज्यात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी लाखो कर्मचारी संपावर आहेत. या संपाचा फटका देखील नुकसानीचे पंचनामे करण्यावर होत आहे. हा संप अजून लांबला तर शेतकऱ्यांना मदत मिळण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, नायब तहसीलदार धनश्री बालचित, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्यासह महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com