Video Abdul Sattar News : अब्दुल सत्तारांच्या शुभेच्छा जाहिरातीवर इम्तियाज जलील, कल्याण काळे यांचे फोटो; सावे संतापले

Political News : पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका जाहिरातीत माजी खासदार इम्तियाज जलील आणि जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांचे फोटो असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Atul Sawe, Kalayn kale, imtiyaj jalil, Abdul Sattar
Atul Sawe, Kalayn kale, imtiyaj jalil, Abdul Sattar Sarakarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sabhajinagr News : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून भाजपकडून ताकही फुंकून पिले जात आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका जाहिरातीत माजी खासदार इम्तियाज जलील आणि जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांचे फोटो असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. (Abdul Sattar News )

छत्रपती संभाजी नगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची निवड झाली. त्यानंतर एका वृत्तपत्रात अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जाहिरात दिली. मात्र, या जाहिरातीत माजी खासदार इम्तियाज जलील आणि जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांचे फोटो असल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चा रंगली आहे. त्यातच या प्रकाराची मंत्री अतुल सावे यांनी याबाबत पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली आहे.

या जाहिरातींवरून मंत्री अतुल सावे (Atul Sawe) हे चांगलेच संतापले आहेत. या प्रकारची त्यांनी चांगलीच गांभीर्याने दखल घेतली आहे. या छापलेल्या फोटोवरून अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांचा चांगलाच समाचार घेत पक्षश्रेष्ठीकडे याबाबत तक्रार करणार असल्याचही सांगितले.

Atul Sawe, Kalayn kale, imtiyaj jalil, Abdul Sattar
Abdul Sattar : पालकमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; ‘नव्वद दिवसांत...’

दरम्यान, ज्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला त्यांचाच या जाहिरातीत फोटो लावला ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. याची तक्रार आम्ही पक्षश्रेष्ठीतल्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना अतुल सावे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेणार त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Atul Sawe, Kalayn kale, imtiyaj jalil, Abdul Sattar
Kamal Vyavahare : 'पुणे शहराचा बट्ट्याबोळ करण्याचे काम बीजेपी सरकारने केलं', कमल व्यवहारे कडाडल्या!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com