Ausa Assembly Constituency : राजकारण हे लोकांच्या हिताचे असले पाहिजे ही शिकवण, म्हणून मारूती- किल्लारी कारखाने वाचवले..

Credit for saving Maruti-Killari sugar factory belongs to me, claims Abhimanyu Pawar : शेतकऱ्यांच्या मालकीच्या या दोन्ही कारखान्यांना आपल्या जवळच्या लोकांच्या घशात अत्यंत कमी पैशात घालण्याचा घाट या लोकांनी घातला होता. किल्लारीच्या लोकांनी माझ्यासमोर हा प्रश्न मांडून हा कारखाना वाचविण्याची विनंती केली.
Abhimanyu Pawar Ausa Constituency
Abhimanyu Pawar Ausa ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 20234 : औसा तालुक्यातील उसउत्पादक शेतकऱ्यांना वरदान असलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना व बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना हे दोन्ही साखर कारखाने कोणाच्या तरी घशात घालण्याचे षडयंत्र सुरू होते. उसउत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हे दोन्ही कारखाने वाचवण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नाला माझ्या नेत्यांनी साथ दिली. त्यामुळे मारुती व किल्लारी कारखाना वाचविण्याचे श्रेय माझेच असल्याचा दावा भाजपा महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी केला.

किल्लारी येथील आपल्या संवाद दौऱ्यात त्यांनी या दोन कारखान्यांविषयी भाष्य करत विरोधकांना सुनावले. या दोन्ही कारखान्याचे वाटोळे करणारे आता मतांसाठी तुमच्यासमोर येत असल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. (Abhimanyu Pawar) लातूर व धाराशिव जिल्ह्यातील जवळपास तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेले किल्लारी व मारुती महाराज साखर कारखाने कोणी बंद पडले? हे सर्वांना ठाऊक आहे.

शेतकऱ्यांच्या मालकीच्या या दोन्ही कारखान्यांना आपल्या जवळच्या लोकांच्या घशात अत्यंत कमी पैशात घालण्याचा घाट या लोकांनी घातला होता. किल्लारीच्या लोकांनी माझ्यासमोर हा प्रश्न मांडून हा कारखाना वाचविण्याची विनंती केली. बेलकुंडचा मारुती महाराज साखर कारखानाही दिवंगत विलासराव देशमुखांनी उदात्त हेतूने उभा केला असतांना तो सात वर्षे बंद ठेवून याचे भंगार केले.

Abhimanyu Pawar Ausa Constituency
MLA Abhimanyu Pawar : आमदार अभिमन्यू पवारांची 'ती' मागणी फडणवीसांनी दोन दिवसात केली मान्य...

जे उमेदवार म्हणून आता तुमच्यासमोर मते मागायला येत आहेत त्यांनीच मारुती महाराज त्यांच्या जवळच्या लोकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र केले होते. मात्र फायद्या तोट्याचा  विचार न करता मी हे दोन्ही कारखाने वाचविण्यासाठी प्रयत्न केले. (BJP) विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या मारुतीची गाळप क्षमता वाढविण्यासाठी माझ्याच विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

या निधीतून सर्वसामान्य लोकांना फायदा होणार असल्याने यामध्ये मी मदतच केली. राजकारण करतांना ते लोकांच्या हिताचे असले पाहिजे ही शिकवण मला माझ्या नेत्यांनी दिली असल्याने किल्लारी कारखाना पुन्हा जोमाने उभा राहिला असल्याचा मला आनंद असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले. ज्यांनी या दोन्ही कारखान्याचे वाटोळे केले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आशा लोकांना धडा शिकविण्याची हीच वेळ असल्याचेही ते म्हणाले. यावेळी किल्लारी व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com