MLA Abhimanyu Pawar : आमदार अभिमन्यू पवारांची 'ती' मागणी फडणवीसांनी दोन दिवसात केली मान्य...

MLA Abhimanyu Pawar on Devendra Fadnavis : आमदार अभिमन्यू पवारांची ती मागणी फडणवीस साहेबांनी आज पूर्ण केली, अभिमन्यू पवार यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
MLA Abhimanyu Pawar on Devendra Fadnavis
MLA Abhimanyu Pawar on Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशना दरम्यान भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सर्व शासकीय पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करावी, अशी विनंती लेखी निवेदन देत केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दोनच दिवसात त्यांची मागणी मान्य केली.

आज सभागृहात बोलताना 'गट-क' ची पदे देखील MPSC मार्फत भरण्याचा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला. विद्यार्थ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार, अशा शब्दात आमदार अभिमन्यू पवार यांनी निर्णयाचे स्वागत केले.

MLA Abhimanyu Pawar on Devendra Fadnavis
Manoj Jarange: भुजबळच हे सर्व घडवत आहेत; जरांगेंचा आरोप; धनगर, ओबीसी विरोधक नाहीत...

पाठपुराव्याला यश !! गेल्याच आठवड्यात सर्व शासकीय पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करावी अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली होती, यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ, ब आणि क दर्जाच्या पदांची भरती केली जाते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पारदर्शक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ओळखला जातो, विद्यार्थी वर्गात आयोगाची विश्वासार्हता खूप चांगली असून नुकतीच 8000 लिपिक पदांची भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवून आयोगाने मोठ्या भरती प्रक्रिया राबवण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

MLA Abhimanyu Pawar on Devendra Fadnavis
MP Sandipan Bhumre : खासदार होताच संदिपान भुमरेंचा ठाकरे गटाला दणका; सरपंच, पाच सदस्य लावले गळाला..

या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला होता. तो फडणवीस साहेबांनी आज पूर्ण केला, अशा शब्दात अभिमन्यू पवार यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेआहे.

सर्व शासकीय नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय झाल्यास शासकिय नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता येईल, असा विश्वास असल्याचे पवार यांनी या निर्णयानंतर म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com