Beed Constituency Violence : "तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची, माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा, आई बापाला दुःख देऊ नका." असं म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना भावनिक आवाहन केलं आहे. अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांता बीड लोकसभा मदारसंघात निसटता पराभव झाला. मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. मात्र अखेर मुंडे यांचा पराभव झाला आणि सोनवणेंच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली.
मात्र, पंकजा मुंडे यांचा हा पराभव मंडे समर्थकांच्या जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचे पडसाद सध्या बीड (Beed) जिल्ह्यात दिसत आहेत. काही ठिकाणी तरुणांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे. या सर्व घटनांनंतर पंकजा मुंडे यांनी आता तरुणांना टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन केलं आहे. येस्तार (अहमदपूर) येथील सचिन कोंडीराम मुंडे या तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाच्या नातेवाईकांशी शनिवारी (8 जून ) रोजी रात्री त्यांनी फोनवरुन संपर्क साधत सांत्वन केले. दरम्यान, या घटनेसंदर्भात एक ट्विट करून त्यांनी समर्थकांना आवाहन केलं.
या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे संयम ठेवत आहे. तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणीतरी माझ्यासाठी जीव देणं हे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्हीही पचवा! अंधाऱ्या रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा, प्लिज, प्लिज.
माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा, आई बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका. तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची. 15 जूनपासून मी आभार दौरा करत आहे. तोपर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.