शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर जयंत पाटलांकडूनही औरंगाबादेत चाचपणी

(Ncp State President Jayant Patil Held Meeting In aurangabad) महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची तुम्ही चिंता करू नका, महापालिकेत शिवसेनेचाच महापौर झाला पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते.
Ncp Leader Jayant Patil in Aurangabad
Ncp Leader Jayant Patil in AurangabadSarkarnama

औरंगाबाद ः आक्रोश मोर्चाचा निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या भाषणात आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची तुम्ही चिंता करू नका, महापालिकेत शिवसेनेचाच महापौर झाला पाहिजे, असे आवाहन केले होते. शिवसेना आघाडी करण्याच्या मनस्थितीत नाही, असेच यातून त्यांना सुचवायचे होते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील औरंगाबादेत आढावा बैठक घेऊन चाचपणी सुरू केली. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज औरंगाबाद शहर आणि ग्रामीण विभागाची पदाधिकारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जयंत पाटील यांनी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेतला.

औरंगाबाद जिल्ह्यात आपल्या पक्षाचे क्षेत्ररक्षण अधिक मजबूत करायला हवे, यासाठी लक्ष केंद्रित करून स्थानिक निवडणुकीची लढाई नीट लढा. सर्वांनी मतदार संघात एकसंघ व्हायला हवे. लढाई कोणाशी आहे त्याचा विचार करायला हवा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

औरंगाबाद जिल्ह्यात बदल करण्याची संधी आता आपल्याकडे आहे. यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळून यशस्वीपणे निवडणूक लढवावी. पक्षाचे काम हे शिस्तीने होण्याची गरज आहे. संघटना बळकट करताना बेरजेचे राजकरण करावे लागेल. जिथे जशी परिस्थिती आहे त्यानुसार लढा देण्याचा प्रयत्न आपण करू, असेही टोपे म्हणाले.

या बैठकी दरम्यान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार सुनील शेळके, विक्रम काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, बसवराज पाटील नागराळकर, मुस्ताक अहमद, औरंगाबाद जिल्हा निरीक्षक माजी आमदार अमरसिंह पंडित, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, औरंगाबाद शहराध्यक्ष विजय साळवे तसेच औरंगाबाद शहर व ग्रामीण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Ncp Leader Jayant Patil in Aurangabad
शिवसेना आमदाराच्या घरावजवळ अवैध धंदे, भाजप आमदाराचा आरोप व आमरण उपोषण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com