Nanded Political News : काँग्रेस महाविकास आघाडीचे खासदार वंसतराव चव्हाण यांच्या निधनाने काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थिती काँग्रेस पक्षाला नांदेडमध्ये विजय मिळवून दिला होता. चोवीस वर्ष नायगावचे सरपंच ते लोकसभा असा त्यांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास राहिला.
या प्रवासात त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. अगदी ज्या भाजप-महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांचा त्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव केला, त्यांच्याशीही कधीकाळी वसंतराव चव्हाण यांचे चांगले संबंध होते. त्यामुळेच वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांना श्रद्धांजली अपर्ण करतानाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कालच हैदराबाद येथे जाऊन वसंतराव चव्हाण यांची भेट घेतली आणि आज पहाटे ही दुःखद बातमी कानावर आली. वसंतरावजींच जाणं निशब्द करणारे असल्याची भावना चिखलीकर यांनी व्यक्त केली. राजकारण बाजूला ठेऊन काही नाते संबध जोपासलेही पाहिजे. रविवारी (25 ऑगस्ट 2024) कालच मी त्यांना भेटायला हैदराबादला गेलो आणि सकाळी वसंतराव गेल्याची बातमी समजली, मनाला अत्यंत वेदना झाल्या.
चिखलीकर परिवार व चव्हाण परिवाराच्या नाते संबंधात आम्ही गुंतलेले आहोतच. (Bjp) परंतु 1992 पासून दोघेही राजकारणात मित्र म्हणून वावरलो. 1992 पूर्वी आम्ही दोघेही सरपंच होतो. 1992 ला जिल्हा परिषद सदस्य तेही झाले आणि मीही झालो आणि तेव्हापासून आमच्या मैत्रीचा सहवास सुरू झाला.
2004 मध्ये मी विधानसभेवर तर वसंतरावजी विधान परिषदेवर होतो. दोघेही अतिशय मनमोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात काम करत होतो. जिल्हा परिषदमधील मैत्री पुढे आमदारकी मध्येही बहरली. आम्ही मध्यवर्ती बँकेत सुद्धा एकत्रित काम केलं, विचारांची प्रगल्भता दिलेरपणा हे ही त्यांचे गुण भावणारे होते.
चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दुःखामध्ये चिखलीकर परिवार सहभागी आहे. ईश्वर चव्हाण कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देओ, हीच प्रार्थना करतो, अशा शब्दात चिखलीकर यांनी वसंतराव चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजप-महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. नांदेड जिल्ह्यातील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसने मिळवलेल्या या विजयाला विशेष महत्व प्राप्त झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.