Nanded Congress MP Vasant Chavan Passes Away : नांदेड काँग्रसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार चव्हाण यांची प्रकृती खालावली होती. हैदराबाद येथील किम्स रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी पहाटे खासदार चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला.
खासदार चव्हाण ( vasant Chavan ) यांची मध्यरात्री प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, पहाटेच्या सुमारास त्यांचं निधन झालं.
काही दिवसांपूर्वी खासदार वसंत चव्हाण अचानक श्वास घेण्यास अडचण आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना नांदेडमधील लाईफकेअर सुपरस्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, पुढील उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे खासदार चव्हाण यांना हैदराबाद येथील रूग्णालयात दाखल केलं होतं.
'जाएंट किलर' ठरलेले वसंत चव्हाण
नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं बालेकिल्ल्यातच काँग्रेसला सुरुंग लावत विजय मिळवला होता. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसने वसंत चव्हाण यांच्या रूपाने आपला गड पुन्हा खेचला केला. तेही अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षासाठी हा विजय महत्त्वपूर्ण होता.
काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी 59 हजार 442 मतांची आघाडी घेत प्रतापराव पाटील यांचा पराभव केला होता. चव्हाण यांना 5 लाख 28 हजार 894 मते पडली होती. तर, भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 4 लाख 69 हजार 453 मते मिळालेली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.