सत्ता गेली अन् धनंजय मुंडे रमले चहाच्या टपरीवर...

Dhananjay Munde|Beed : आज भर पावसात धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
Dhananjay Munde Latest News
Dhananjay Munde Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde : गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ बघायला मिळाल्या. शिवसेनेचे नेते आणि आता मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंड केले आणि सुमारे 40 शिवसेनेच्या आमदारांच्या साथीने राज्यात त्यांनी भाजपच्या समर्थनाने नवं सरकार स्थापन केल. त्यामुळे शिनसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.

यामुळे आघाडी सरकार मधील माजी मंत्री आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये रमतांना दिसत आहेत. राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आज आपल्या मतदारसंघात रमलेले बघायला मिळाले. त्यांनी आज भर पावसात वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं अन् त्यानंतर मंदिरासमोरील चहाच्या टपरीवर मुंडेंनी चहा घेतला. यावेळी त्यांच्या कट्ट्यावरील गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या.

Dhananjay Munde Latest News
सेना पुन्हा उभी राहणार नाही, ठाकरे पितापुत्रांनी गप्प राहावे : नारायण राणेंनी मीठ चोळले

आज परळी शहरात दिवसभर हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता. दरम्यान मुंडेंनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही भागामध्ये आणखी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावू शकते? तर आगामी काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर असलेले दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी प्रभू वैद्यनाथांकडे प्रार्थना केल्याचे धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

Dhananjay Munde Latest News
बंडखोरांच्या मनात चाललयं काय? : एकाच सुरात म्हणतात,``ठाकरेंनी बोलावलं तर..

दरम्यान, मंदिरात दर्शन झाल्यानंतर मंदिरासमोरील प्रसिद्ध शिरीष स्वामी यांच्या चहाच्या कट्ट्यावर मुंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चहा घेतला. हॉटेल चालक शिरीष स्वामी यांच्यासोबत त्यांनी फोटो देखील काढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com