Jalna Political News : कृषिमंत्री, पालकमंत्री हरवले आहेत, सापडल्यास कळवा ; बॅनरने लक्ष वेधले..

Affected Farmers : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार योग्य ते धोरण राबवणार का? कोरड्या दुष्काळाची मदत देणार का ?
Jalna Farmer Banner News
Jalna Farmer Banner NewsSarkarnama

Marathwada Political : मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे, पावसाने पाठ फिरवल्याने पिकांनी माना टाकल्या. शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे, पण कृषिमंत्री, पालकमंत्री मात्र फिरकायला तयार नाहीत असा आरोप करत एका शेतकऱ्याने बॅनर लावत सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (Affected Farmers) भोकरदन तालुक्यातील या शेतकऱ्याने गावाच्या मुख्य रस्त्यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हरवले आहेत, असे बॅनर लावत सरकारबद्दलचा संताप व्यक्त केला.

Jalna Farmer Banner News
Imtiaz Jaleel On Maratha Protest : मनोजभाऊ उपोषण सोडा, लाख मराठा सोबत घेऊन मुंबईत धडक द्या..

राज्यात विशेषत: मराठवाड्यात (Marathwada) पावसाअभावी पिकांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारकडून मदत तर दूर, पण कुणी बांधावर यायलाही तयार नाही. या पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे फाट्यावरील (Jalna) जालना ते सिल्लोड महामार्गावर कृषिमंत्री, पालकमंत्री हरवले आहेत, असे बॅनर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. या बॅनरच्या माध्यमातून या शेतकऱ्याने सरकारला काही प्रश्नांच्या माध्यमातून जाब विचारला आहे.

यामध्ये सरकारला प्रश्न विचारण्यात आले आहे. ज्यांना कुणाला कृषिमंत्री धनंजय मुंडे, (Dhananjay Munde) पालकमंत्री अतुल सावे सापडतील त्यांनी संपर्क साधावा, त्यांना पावसाअभावी पिकांचा झालेला पालापाचोळा भेट द्यायचा आहे, असा संताप शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे सरकार देणार का? मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करणार का ? हक्काचा पिक विमा, पिक कर्ज मिळणार का ? पालापाचोळा झालेल्या पिकांचे बांधावर जाऊन पंचनामे प्रशासन व मंत्री करणार का ? असे प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत.

याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार योग्य ते धोरण राबवणार का? सरकार कोरड्या दुष्काळाची मदत शेतकऱ्यांना देणार का ? असा सवाल देखील बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी केला आहे. पिकांचे नुकसान झालेले असतांना तहसीलदार, कृषीअधिकारी,पालकमंत्री, कृषिमंत्री बांधावर यायला तयार नाहीत. सरकारला आमच्या भावना कळाव्यात म्हणून बॅनर लावले आहे. तात्काळ अधिकारी, मंत्री बांधावर आले नाही तर त्यांच्या दालनात पालापाचोळा झालेली पिकं फेकून आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com