Latur News : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळ अधिवेशना दरम्यान सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
या सगळ्या वादाचे मुळ असलेल्या कृषीमंत्री कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या सभागृहातील रमी खेळण्याबाबत आता विधानसभा अध्यक्षांनीच स्पष्टीकरण द्यावे. खरे काय खोटे काय? हे सांगावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केली. विधिमंडळाच्या अधिवेशनात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाइलवर रमी खेळत असल्याचे दिसत आहे. हा सभागृहात झालेला विषय आहे. यासंदर्भात खरे काय आणि खोटे काय, याचे स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती यांनी राज्याच्या जनतेला द्यावे, असेही देशमुख म्हणाले.
लातूरमध्ये झालेल्या कालच्या राड्यावर भाष्य करताना पत्रकारांशी संवाद साधताना अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी विधानसभा अध्यक्ष आणि परिषदेच्या सभापतींकडेच बोट दाखवले आहे. कृषिमंत्री मोबाइलवर रमी खेळत असल्याचा प्रकार सभागृहात घडला. असे काही घडलेच नाही, असे सत्ताधारी म्हणत आहेत, तर हा प्रकार घडलाय, असे विरोधक म्हणत आहेत. या प्रकारातून सभागृहाच्या गरिमेला ठेच पोचली आहे.
त्यामुळे अध्यक्ष व सभापतींनी किंवा त्यांच्या कार्यालयाने याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मागण्या भरपूर होतात पण सत्ताधारी संवेदनशील असले पाहिजेत. एखाद्या मंत्र्याने अनुचित प्रकार केला, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण, सध्याचे सत्ताधारी असंवेदनशील व अतिनैतिक असल्याने त्यांनी यासंदर्भात काय करायचे ते ठरवावे, अशी टीकाही अमित देशमुख यांनी केली.
हनी ट्रॅपसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आहे. यात शासनाचे अधिकारी असतील, तर शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. यात दोषींवर शासनाने कारवाई झाली पाहिजे. तसेच शहरात काही दिवसांपूर्वी एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपने केलेले आंदोलन हा विनोद होता; पण घाडगे यांना मारहाण केलेल्या घटनेचा चेहरा हा क्रूर होता, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.