AIMIM Criticize BJP News : मोदीजी महाराष्ट्रातही निवडणुका घ्या, आम्हालाही चारशे रुपयात गॅस द्या..

Maharashtra News : याचा अर्थ असा की स्वस्त दरात गॅस विकणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोक भाजपला मत देतात!
AIMIM Criticize BJP News
AIMIM Criticize BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

MP Imtiaz Jaleel News : देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. सत्तधारी भाजप आणि काँग्रेसह इतर विरोधकांमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेला स्वस्तात गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांकडून प्रचारा दरम्यान दिले जात आहे. (AIMIM Criticize BJP News) राजस्थान राज्यातील निवडणूक प्रचारात भाजपने लावलेले असेच एक पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

AIMIM Criticize BJP News
Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस का? राहुल गांधींनी सांगितली 'ही' आठ कारणं

यावरूनच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भाजवर निशाणा साधला. राजस्थान मध्ये निवडणुका आहेत म्हणून चारशे रुपयात गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन भाजप (BJP) देत असेल तर मग लवकर महाराष्ट्रातही निवडणुका घ्या. आम्हाला आणि भाजपच्या लोकांनाही इथे सध्या 1 हजार रुपयांमध्ये गॅस घ्यावा लागत आहे, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.

वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या गगणाला भिडलेल्या किंमती भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. (AIMIM) मणिपूर, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे वातावरण तापले आहे. काही राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे, तर काही ठिकाणी अंतिम टप्प्याचे मतदान होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या निवडणुक प्रचारात महागाईचा मुद्दा प्रमुख अस्त्र म्हणून हाती घेतला आहे. सत्तेसाठी विरोधकांनी स्वस्त गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यातून जनतेला दिले आहे. मग यावर कुरघोडीसाठी सत्ताधारी भाजपनेही चारशे रुपयात गॅस सिलिंडर देण्याची `मोदी गॅरंटी` देणारे पोस्टर झळकवले. राजस्थान मध्ये काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी शहर आणि गावांमध्ये अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आले आहेत. निवडणुका आहेत म्हणून चारशे रुपयात गॅस सिलिंडर देणार असाल तर महाराष्ट्रातही निवडणुका घ्या, कारण आम्हाला हजार रुपयांत गॅस घ्यावा लागत आहे, असा चिमटा इम्तियाज जलील यांनी काढला आहे.

इम्तियाज जलील यांचा एमआयएम हा पक्ष मध्य प्रदेशातील चार विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढवत आहे. व्वा मोदीजी व्वा! कृपया महाराष्ट्रात निवडणुका घ्या कारण भाजपच्या लोकांनाही गॅस सिलिंडर 1000 मध्ये मिळत आहे! याचा अर्थ असा की स्वस्त दरात गॅस विकणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोक भाजपला मत देतात! हे पोस्टर्स आणि होर्डिंग्ज राजस्थानमध्ये लावण्यात आले आहे, जिथे विधानसभेच्या निवडणुका होतायेत, अशी पोस्ट इम्तियाज यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com