Mp Imtiaz Jalil Reaction News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil Reaction News, AurangabadSarkarnama

Aimim : शिंदे सरकारचे शंभर दिवस घाणेरड्या राजकारणाचे..

नवी पिढी या क्षेत्राकडे वेगळ्याच नजरेने पाहते आहे. राजकारणा इतके गलिच्छ दुसले कुठलेच क्षेत्र नाही? अशी त्यांची भावना झाली तर नवल वाटायला नको. (Mp Imtiaz Jalil)
Published on

औरंगाबाद : राज्यातील राजकारणाची पातळी कधी नव्हे ती इतकी खालावली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवस झाले, या शंभर दिवसात सरकारची कामगिरी काय? तर मी मोठा की तो मोठा? याची स्पर्धा आणि आरोप-प्रत्योरापांचे सत्र, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी राज्य सरकारवर टीका केली.

राजकारणात येऊ पाहणारी नवी पिढी आजचे वातावरण आणि राजकारणाचा घसरलेला स्तर पाहता, या क्षेत्रात येण्यास धजावणार नाही, असेही देखील ते म्हणाले. (Eknath Shinde) शिंदे-फडणवीस सरकार शंभर दिवसात सातशे निर्णय घेतल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे.(Aimim) विरोधकांनी मात्र या सरकारवर तोफ डागली आहे.

इम्तियाज जलील यांनी या सरकारने शंभर दिवसात जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नसल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, जनता आपल्याला मोठ्या अपेक्षने निवडून देत असते, लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी देखील वैयक्तिक स्वार्थापेक्षा लोकांच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे. परंतु दुर्दैवाने आज राज्यातील राजकीय परिस्थिती याच्या नेमकी उलटी आहे.

शिंदे सरकारने शंभर दिवसात काय केले? हा खरचं प्रश्न आहे. मी मोठा, की तू मोठा? यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री, आमदार, खासदार व्यस्त आहेत. आरोप करतांना अत्यंत खालची पातळी दोन्ही बाजूंनी गाठली जात आहे. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. जनतेच्या प्रश्नांशी यांना काहीच देणेघेणे नाही, हेच यावरून दिसून आले.

Mp Imtiaz Jalil Reaction News, Aurangabad
Imtiaz Jalil : आम्ही आजही वंचितसोबत जाण्यास तयार..

एकमेकांना कमी दाखवण्यासाठी होणारे आरोप याने लोकांचे मनोरंजन होत नाही, तर त्यांच्या मनात राजकारण्यांबद्दलची प्रतिमा मलीन होत आहे, याचे भान देखील सत्ताधाऱ्यांना राहिलेले नाही. राजकारणात नव्या, शिक्षित तरूणांनी यावे, असे आपण नेहमीच म्हणतो. कारण त्यांच्याकडून लोकांची चांगली सेवा घडेल, अशी अपेक्षा असते.

पण राजकारणाचा घसरता स्तर पाहता नवी पिढी या क्षेत्राकडे वेगळ्याच नजरेने पाहते आहे. राजकारणा इतके गलिच्छ दुसले कुठलेच क्षेत्र नाही? अशी त्यांची भावना झाली तर नवल वाटायला नको. राज्यात सुरू असलेला हा राजकीय तमाशा आता बंद झाला पाहिजे, अशी अपेक्षाही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com