Aimim Chief Asaduudin Owasi News
Aimim Chief Asaduudin Owasi NewsSarkarnama

Aimim News : एमआयएमचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन २५ पासून मुंबईत, दोन सभाही होणार..

Mumbai : राष्ट्रीय कार्यकारीणीसह सर्व राज्यातील प्रमुख पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत.
Published on

Aurangabad : राज्याच्या राजकारणात उलथापालथ सुरू असतांनाच आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत एमआयएमने (Aimim) जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत २५ व २६ फेब्रुवारी रोजी होत आहे. या दरम्यान, पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्या दोन सभा देखील होणार आहेत.

Aimim Chief Asaduudin Owasi News
Eknath Shinde News : आम्हाला कुणाचीही संपत्ती नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती..

राष्ट्रीय कार्यकारीणीसह सर्व राज्यातील प्रमुख पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत. (Mumbai) अधिवेशनात एमआयएम पक्ष संगठन, पक्षाची विचारसरणी व ध्येय धोरणानुसार काम करत असतांना काही बदल करणे अपेक्षीत आहे किंवा कसे ? राज्यात पक्षाचे स्थान, आगामी काळात केले जाणारे बदल या दृष्टीने नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. (Asaduudin Owasi) दोन दिवसाच्या अधिवेशनात प्रमुख पदाधिकार्‍यांनी व्यक्त केलेले मत व दिलेल्या सूचनांवर देखील चर्चा होणार आहे.

२५ फेब्रुवारी रोजी एमआयएम पक्षाची संपुर्ण राष्ट्रीय कार्यकारीणी, राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार, आमदार आणि विविध राज्याचे प्रदेश अध्यक्ष सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्याच्या प्रदेश अध्यक्षांना त्यांचे मुद्देसूद मत मांडण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे.

दुसर्‍या दिवशी २६ रोजी एमआयएम पक्षाचे देशभरातील विविध राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच महिला विंग, युथ विंग, स्टुडंट विंगचे जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्ष यांच्यासह पक्षाच्या वतीने निवडुन आलेले सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतचे सदस्य सहभागी होणार आहे.

सर्व राज्यातील विविध मतदारसंघात निवडणुक लढविणारे इच्छूक देखील सहभागी होणार आहे. या दरम्यान, पदाधिकार्‍यांना असदोद्दीन ओवेसी मागदर्शन करणार आहेत. याशिवाय २५ फेब्रुवारी शनिवारी सायंकाळी सात वाजता तर २६ फेब्रुवारी मुंबईत ओवेसींची सभा देखील होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com