AIMIM News : ओवेसी आता समान नागरी कायद्याच्या विरोधात मैदानात उतरणार..

Asaduddin Owaisi : राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीत पक्षाची वोट बॅंक अधिक मजबुत करण्याचा हेतू.
Aimim Chief Asaduudin Owasi News
Aimim Chief Asaduudin Owasi NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : येत्या पावसाळी अधिवेशनात केंद्रातील मोदी सरकार समान नागरी कायदा बील सभागृहात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (AIMIM News) या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी संघर्षाच्या पावित्र्यात आहेत. मंगळवारी (ता.११) छत्रपती संभाजीनगरात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत.

ट्रीपल तलाक, सीसीए, एनआरसीच्या विरोधात ओवेसी यांनी आक्रमक भूमिका घेत याविरोधात लोकसभेत आवाज उठवला होता. (Aimim) आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका पाहता मोदी सरकार समान नागरी कायदा बील आणू पाहत आहे. (Asaduddin Owaisi) या कायद्याला विरोध करण्याची तयारी एमआयएमने सुरू केली आहे. याची सुरूवात छत्रपती संभाजीनगरमधून होत आहे.

महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेल्या शहरातूनच ओवेसी समान नागरी कायद्याच्या विरोधात एल्गार करण्याच्या तयारीत आहे. (Aurangabad) शहरातील तापडीया नाट्य मंदिरात उद्या, मंगळवारी दुपारी ओवेसी हे शहरातील विविध वर्गातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. या कार्याक्रमाच्या माध्यमातून एमआयएम लोकसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू करत आहे.

राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीत पक्षाची वोट बॅंक अधिक मजबुत करण्याचा हेतू देखील ओवेसी यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमने अनपेक्षितरित्या विजय मिळवला होता. चार वर्षात खासदार इम्तियाज जलील यांची कामगिरी देखील सरस ठरली. विरोधक म्हणून त्यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे.

मतांचे विभाजन आणि राजकीय पक्षांमधील अस्थिरता पुन्हा एमआयएमच्या पथ्यावर पडण्याची शक्यता देखील या निमित्ताने पडताळून पाहिली जात आहे. समान नागरी कायदा हा मुद्दा जसा भाजपला फायदा मिळवून देणारा ठरणार आहे, तसा त्याला विरोध करणाऱ्या एमआयएमला देखील हा मुद्दा त्यांची वोट बॅंक मजबुत करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. ओवेसी समान नागरी कायद्यावर उद्या काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com