Aimim : डोक्यावर नोटांची उधळण सुरू होती, अन् इम्तियाज जलील टाळ्या वाजवत होते..

आपल्याच महोत्सवात स्वतःवर झालेल्या पैशाच्या उधळणीमुळे या चांगल्या उपक्रमाला शेवटच्या टप्यात गालबोट लागले असेच म्हणावे लागेल. (Mp Imtiaz Jalil)
Mp Imtiaz Jalil News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्या दुवा फाऊंडेशनच्या वतीने नशा मुक्तीसाठी शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून आयजे महोत्सावचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत क्रिकेट, फुटबाॅल, कुस्ती, खाद्य महोत्सव आणि मुशायरा, कव्वाली अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे नशामुक्तीसाठी हा महोत्सव असल्याचे सांगितले जात आहे तर दुसरीकडे कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील व या महोत्सवाच्या आयोजनात त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे त्यांचे पुत्र बिलाल यांच्यावर उत्साही समर्थकांनी अक्षरशः नोटांची उधळण केली.

Mp Imtiaz Jalil News, Aurangabad
खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का; पवनराजेंचे विश्वासू सहकारी शिंदे गटात प्रवेश करणार

नोटा उधळल्यामुळे यापुर्वी देखील इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) हे वादात सापडले होते. पण त्यातून त्यांनी काही धडा घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळेच डोक्यावर नोटांची उधळण सुरू असतांना त्यांनी या कार्यकर्त्यांना रोखण्याऐवजी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. (Aurangabad) राज्यातील शेतकरी अडचणीत आहे, विरोधकांकडून ओल्या दुष्काळाची मागणी होत आहे, अशावेळी खासदारांनी डोक्यावर होणाऱ्या पैशाची उधळण उघड्या डोळ्याने पहावी आणि त्यावर टाळ्या वाजवाव्यात याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

इम्तियाज जलील यांच्या या महोत्सवाला सगळ्याच राजकीय पक्षांनी हजेरी लावली होती.प्रशासनातील अधिकारी ते मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे, अमोल कोल्हे यांच्यासह अनेकांनी या महोत्सवाला हजेरी लावत इम्तियाज जलील यांच्या नशा मुक्तीच्या उपक्रमाचे स्वागत केले.

विविध स्पर्धा भरवत त्यांनी खेळाला प्रोत्साहन दिल्याबद्दल देखील त्यांच्यावर विविध स्तरातुन स्तुतीसुमने उधळली जात आहेत. असे असतांना इम्तियाज यांनी स्वतःवर होणारी पैशाची उधळण थांबवायला हवी होती, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. इम्तियाज जलील हे अभ्यासू खासदार म्हणून ओळखले जातात.

कोणत्यावेळी कधी काय भूमिका घ्यायची आणि विरोधकांना अडचणीत आणायचे याचे टायमिंग देखील ते साधतात. परंतु आपल्याच महोत्सवात स्वतःवर झालेल्या पैशाच्या उधळणीमुळे या चांगल्या उपक्रमाला शेवटच्या टप्यात गालबोट लागले असेच म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com