AIMIM : अकबरुद्दीन ओवेसींचे जंगी स्वागत ; औरंगजेब दर्ग्याचे घेतले दर्शन..

या संपुर्ण दौऱ्यात एमआयएमच्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ठिकठिकाणी अकबरुद्दीने ओवेसी यांचे स्वागत करण्यात आले. (Aimim)
Akbaruddin Owasi In Aurangabad
Akbaruddin Owasi In AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : एमआयएमचे वादग्रस्त नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांचे औरंगाबादेत जंगी स्वागत करण्यात आले. (Aimim) औरंगाबादेत दाखल होताच त्यांनी शहरातील दर्गा, खुल्ताबाद येथील औरंगजेब दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले.

` नकीब-ए-मिल्लत एज्युकेशनल`, संस्थेची पायाभरणी करण्यासाठी अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादेत आले आहेत. (Aurangabad) आ रहा हूं औरंगाबाद, असे म्हणत एमआयएमचे नेते, आमदार आणि संस्थापक अध्यक्ष सालार-ए-मिल्लत एज्युकेशनल ट्रस्ट, हबीब-ए-मिल्लत अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावतीने `नकीब-ए-मिल्लत एज्युकेशनल` च्या औरंगाबादेतील शाखेची पायाभरणी आज होत आहे.

हिमायत बाग येथे ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सची शाखा सुरू करण्यात येणार आहे. या शाळेच्या इमारतीची पायाभरणी ओवेसी यांच्या हस्ते केली जात आहे. दरम्यान, औरंगाबादेत दाखल होताच अकबरुद्दीन ओवेसी यांचे एमआयएमच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या सोबत त्यांनी शहरातील पानचक्की येथील दर्गा, खुल्ताबाद येथील औरंगजेब दर्ग्याला भेट देऊन दर्शनही घेतले.

Akbaruddin Owasi In Aurangabad
Jalna : तुमच्यासारख्या चिल्लर माणसाने मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या माणसाबद्दल बोलू नये..

त्यांच्या या संपुर्ण दौऱ्यात एमआयएमच्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ठिकठिकाणी अकबरुद्दीने ओवेसी यांचे स्वागत करण्यात आले. दुपारी चार वाजता ओवेसी यांच्या वतीने हैदराबादेत गरीब मुला-मुलींसाठी चालवणाऱ्या जाणाऱ्या मोफत शांळाची महाराष्ट्रातील औरंगाबादेतील पहिल्या शाखेची पायाभरणी करण्यात आली.

हैदराबादमध्ये अशा प्रकारच्या ११ शाळा अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावतीने चालवल्या जातात. येथील सर्व खर्च ते स्वतः उचलतात. शैक्षणिक आणि धर्मादाय ट्रस्टच्या माध्यमातून या शाळांचे व्यवस्थापन केले जाते. हजारो मुली आणि महिलांना येथे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासोबतच हजारो मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सची महाराष्ट्रातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये स्थापन होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com