MP Ajit Gopchade News : लग्नाळूंची फसवणूक रोखा ; विवाह नोंदणी वेबसाईटवर नियंत्रण आणा! अजित गोपछडे यांची मागणी

Increasing frauds by matrimonial websites: देशभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि विविध नावांनी चालणाऱ्या विवाह नोंदणी वेबसाईटद्वारे अमिष दाखवून, विश्वास संपादन करून नागरिकांची लूट केली जाते.
MP Ajit Gopchade News
MP Ajit Gopchade NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP News : भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी एका वेगळ्याच सामाजिक विषयाला हात घातला. विवाह इच्छूकांच्या नोंदणी करणाऱ्या वेबसाईटचा सुळसुळाट झाल्याने फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी अशा वेबसाईटवर नियंत्रण आणण्याची मागणी गोपछडे यांनी राज्यसभेत केली. देशभरात वेगवेगळ्या विवाह नोंदणी वेबसाईटच्या माध्यमातून अविवाहित, परीतक्त्या, विधवा व विधुर अशा विवाह इच्छुक नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते.

या विषयाकडे गोपछडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. विवाह इच्छुकांच्या फसवणूक प्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अशा वेबसाईटवर नियंत्रण आणावे, अशी मागणी डॉ. अजित गोपछडे यांनी केली आहे. (Marriage) देशभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि विविध नावांनी चालणाऱ्या विवाह नोंदणी वेबसाईटद्वारे अमिष दाखवून, विश्वास संपादन करून नागरिकांची लूट केली जाते.

यामध्ये नात्याच्या नावाखाली फसवणूक, खोटी माहिती, आणि काही प्रकरणांमध्ये लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे. (BJP) छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका व्यक्तीने सहा बनावट वेबसाईट तयार करून तब्बल पाचशे लोकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

MP Ajit Gopchade News
Ajit Gopchade News : शेतकरी आत्महत्या अन् दुष्काळग्रस्त मराठवाडा हा कलंक पुसायचायं! अजित गोपछडेंचे थेट अमित शहांना साकडे

याचप्रमाणे पुणे शहरात एका महिलेला जम्मू-काश्मीरमधील एका व्यक्तीने विवाहाच्या अमिषाने फसवून लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने देखील अलीकडेच अनियंत्रित विवाह नोंदणी वेबसाईटबाबत चिंता व्यक्त केली असून, या क्षेत्रासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

MP Ajit Gopchade News
Congress Vs Bjp: काँग्रेस भाजपची झोप उडवणार! 'स्थानिक'च्या निवडणुकांसाठी सपकाळांनी टाकला मोठा डाव; तब्बल 280 जणांची टीम अन्...

अशा वेबसाईटवर काटेकोर नियंत्रण ठेवणारे कायदे तयार करावेत, नियमावली लागू करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही नागरिकाची फसवणूक होणार नाही. अनेकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या या ऑनलाइन फसवणुकीवर केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालून कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत असल्याचे गोपछडे यांनी सभागृहात सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com