

Ajit Pawar NCP : ऐन नगरपालिका निवडणुकीत, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांमधील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील वादाबरोबर आमदारांमधील वाद, देखील थेट निवडणुकीच्या मैदानात येऊ लागले आहे.
बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्टार प्रचारक म्हणून, आमदार धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका, असा थेट पक्षाला निरोप पाठवला आहे. पाठवल्यास वेगळेच काहीतरी विपरीत घडेल, अशी भीती देखील व्यक्त केली आहे. प्रकाश सोळंके यांनी थेट पक्षाला धनंजय मुंडेंबाबत, असा निरोप दिल्याने खळबळ उडाली आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. निवडणुकीचं आज चित्र स्पष्ट होताच, महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसह मैदानातील उमेदवारांनी प्रचाराला गती घेतली आहे. पक्ष पातळीवर देखील प्रचाराची रणनीती आखून नेते मैदानात उतरले आहे.
पक्षांनी स्टार प्रचारक जाहीर करत, त्यांना मैदानात उतरले आहे. प्रचारामुळे राज्यातील निवडणुकीचं वातावरण ऐन हिवाळ्यात तापलं आहे. पण यातच आपापसातील हेवेदावे देखील समोर येऊ लागले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर समोर आलेल्या गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा अतिशय संवेदनशील बनला आहे. मराठा, ओबीसी राजकारणासाठी तर बीड जिल्हा राज्याची राजकीय रणभूमी ठरला होता. यात सर्वाधिक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) टार्गेट झाले.
आता नगरपालिका निवडणुकीत याच पक्षातील नेत्यांमुळे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांना मतदारसंघात पाठवण्यास विरोध केला आहे. तसा त्यांनी पक्षाला निरोप देखील पाठवला आहे. 'ते इथं स्टारपणा काय दाखवतील, त्यांनी स्टार प्रचारक म्हणून परळीतच काम करावं, ते माजलगावमध्ये आले, तर वेगळेच काहीतरी विपरीत घडेल,' अशी भीती प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली आहे.
प्रकाश सोळंके म्हणाले, "परळीमध्ये मुंडे बहीण-भावाची युती होती. मग जिल्ह्यात का होत नाही? युती होऊ नये म्हणून काहींनी प्रयत्न केले. मात्र युती होण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही, हे दुर्दैव आहे." स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती होणं खूप अवघड आहे आणि त्यामध्ये बीड जिल्ह्यात फक्त परळीमध्ये युती होते, याकडे लक्ष वेधत प्रकाश सोळंके यांनी लक्ष वेधलं.
'जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी युती होत नाही. पण आम्ही आमची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देऊ, असे म्हणत आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी युतीसाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. युती होऊ नये यासाठीच खूप प्रयत्न झाले, असे मला वाटत आहे,' असेही प्रकाश सोळंक यांनी म्हटले.
'मुंडे बहीण भावाला ज्यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून जिम्मेदारी दिली आहे. त्यांना इथं काही बोलवण्याचं कारण नाही, त्यांचा इथं काय स्टारपणा दाखवतील, त्यांना मी इथं बोलवणारही नाही, कुणाचे काही स्टार प्रचारक म्हणून काम करायचा आहे, त्यांनी परळीमध्ये करावं, आमच्या भागात आले, तर त्याचा विपरीत परिणाम होईल,' असा खणखणीत इशारा सोळंके यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.