Ncp : राज्यातील सत्तांतरानंतर अनेक घटना घडामोडी घडल्या. चाळीस गद्दार म्हणत ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदार, मंत्र्यांविरोधात जोरादर मोहिम छेडण्यात आली आहे. ठाकरे गटानंतर आता (Ncp) राष्ट्रवादीदेखील मैदानात उतरली असून जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघात मेळावे घेत शक्तीप्रदर्शन केले जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आज औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत वैजापूर व पैठणमध्ये शेतकरी मेळावे होत आहेत. (Paithan) पैठण हा राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा तर वैजापूर आमदार बोरनारे यांचा मतदार संघ आहे. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीने यापुर्वी विजय मिळवलेला आहे.
पैठणमधून संजय वाघचौरे, तर वैजापूरमधून २०१४ च्या मोदी लाटेत भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर हे विजयी झाले होते. काही महिन्यापुर्वीच चिकटगांवकर यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत विरोधाला कंटाळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. राज्यात महाविकास आघाडी असली तरी एकमेकांचे आमदार, मंत्री फोडण्याचे किंवा त्यांना पक्षात प्रवेश देणे सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पैठण आणि वैजापूरमधील शेतकरी मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपुर्वीच या दोन्ही मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून बोरनारे-भुमरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होतती.
त्यानंतर आता अजित पवार या दोघांवर काय टीका करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वैजापूरमध्ये चिकटगांवकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर अजित पवार पहिल्यांदाच येत आहेत. तर पैठणचा त्यांचा दौरा देखील बऱ्याच गॅपनंतर होत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.