
Jalna News : आधी महाविकास आघाडी आणि नंतर शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा ठराव घेतला. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले, पण अजूनही राजकारण्यांच्या तोंडातून अनावधानाने औरंगाबादचा उल्लेख होतांना दिसतोय. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज जालना जिल्ह्यातील घनसावंगीत एका कार्यक्रमानिमित्त आले होते.
यावेळी भाषणात २ एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) संयुक्त सभेचा उल्लेख करतांनाचे चुकून औरंगाबाद असे बोलून गेले. पण ही चूक लक्षात येताच त्यांनी ताबडतोब छत्रपती संभाजीनगररात अशी सुधारणा केली. (Ncp) अजित पवार म्हणाले, राज्यातील सरकार कसे आले, कशी फोडाफोडी झाली हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत कधी असा प्रसंग घडला नव्हता.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहेच. पण या सरकारच्या कारभार सांगण्यासाठीच महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा राज्यभरात होत आहेत. २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात ही सभा होणार आहे. मी, उद्धव ठाकरे, नाना पटोले सगळेच सभेला येणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना शक्य नसले तरी ज्यांना जमेल त्यांनी स्वतःच्या खर्चानी त्या सभेला आलं पाहिजे, असा चिमटा देखील पवारांनी काढला.
विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज्य सरकार हादरले आहे. फोडाफोडी करून आणलेलं सरकार लोकांना मान्य नाही हे लक्षात आल्यामुळेच सरकारकडून जाहीरातबाजी सुरू असल्याची टीका पवारांनी केली. आनंदाचा शिधा योजनेवर बोलतांना प्रत्येकी एक किलोच्या चार वस्तू दिल्याने एखाद्या कुटुंबांचे भागते का? गरिबांची चेष्टा का चालवलीय? अशी टीका देखील अजित पवारांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.