Jay Pawar Meet Manoj Jarange
Jay Pawar Meet Manoj Jarange

Jay Pawar Meet Manoj Jarange : मनोज जरांगे-जय पवार भेटीचं नेमकं गणित काय?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंब एकटे पडल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सर्व कुटुंब सहभागी झाले आहेत. तर सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पती अजित पवार, मुलगा पार्थ आणि जय हे सक्रिय असल्याचे दिसत आहेत.

Maharashtra Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी कुटुंबातच लढत होत आहे. या लढतीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असेच पाहिले जात आहे. लोकसभेनिमित्त या दोन्ही नेत्यांनी आपली ताकद पणांना लावलेली आहे.

या नेत्यांनी छोट्या छोट्या घटकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न केले. अडगळीत पडलेल्या जुन्या सहकाऱ्यांना ताकद दिली. अशातच अजित पवार Ajit Pawar गटाने मोठी चाल खेळली आहे. अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांनी थेट अंतरवाली सराटी गाठत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. या भेटीमागे बारामतीचे नेमके काय गणित दडले आहे, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात होणार्‍या नणंद-भावजयमध्ये लढतीच्या प्रचाराचा आज रविवारी (ता. 5) शेवटचा दिवस आहे. त्यासाठी शरद पवार Sharad Pawar आणि अजित पवारांनी मतदारसंघात सभांचा धडाका सुरू आहे. दुसरीकडे मात्र जय पवारांनी अनपेक्षितपणे मराठा आंदोलनस्थळी जात मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

Jay Pawar Meet Manoj Jarange
Dharashiv Loksabha Constituency : प्रामाणिक माणसाला मत देणार की संधीसाधू ? ओमराजे यांचा सवाल..

मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीरपणे आरोप केले होते. तसेच मनोज जरांगेंना Manoj Jarange शरद पवार गटाचे बळ आहे, असेही बोलले जात आहे. त्यातच मनोज जरांगेंविरोधात ओबीसी समाजही सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. या साऱ्याचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना बसण्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. पवार कुटुंबातील पडलेल्या उभ्या दरीमुळे बारामतीत जरांगे फॅक्टर स्पष्टपणे दिसत नसला तरी रिस्क घेण्याची कुणाचीही तयारी नाही. यातूनच जय पवारांनी थेट जरांगे पाटलांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jay Pawar Meet Manoj Jarange
Solapur Police : सोलापूर पोलिसांचा दणका; लोकसभा मतदानाच्या तोंडावर राजकीय नेत्यांसह 32 जण हद्दपार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंब एकटे पडल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळेंच्या Supriya Sule प्रचारात सर्व कुटुंब सहभागी झाले आहेत. तर सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पती अजित पवार, मुलगा पार्थ आणि जय हे सक्रिय असल्याचे दिसत आहेत. या मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होत आहे. तत्पुर्वीच म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जय पवारांनी थेट जरांगे पाटलांची भेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com