Ajit Pawar : 'उमेदवार ठरवायला आपल्याला दिल्लीला जावं लागतं नाही', अजितदादांचा भाजपाला टोला!

EX MLA Shivaji Chothe Join NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजी चोथेंवर सोपवणार महत्वाची जबाबदारी.
Ajit Pawar- BJP News Chhatrapati Sambhajinagar
Ajit Pawar- BJP News Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अजित पवार यांनी भाजपावर अप्रत्यक्ष प्रहार करताना "उमेदवार ठरवायला दिल्लीला जायचं लागतं नाही" असा टोला लगावला.

  2. माजी आमदार शिवाजी चोथे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जालन्याच्या राजकारणात नवीन समीकरणं निर्माण केली.

  3. या घडामोडींमुळे जालना, घनसावंगी-अंबड मतदारसंघात राष्ट्रवादीला काँग्रेसला फायदा होणार.

NCP News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. फटकाळ पण आपले विचार स्पष्टपणे मांडण्यात त्यांचा कोणी हात धरणार नाही. मग अगदी मित्र पक्षही त्यांच्या तावडीतून सुटत नाही. अंबड घनसावंगीचे माजी आमदार शिवाजी चोथे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात चोथे आणि त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा योग्य सन्मान राखला जाईल, हे सांगताना त्यांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाला टोला लगावला.

शिवाजीराव तुम्ही आणि तुमच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर 'आगीतून निघालो अन् फुफाट्यात अडकलो', अशी भावना निर्माण होणार नाही, याचा शब्द मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून देतो. निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही, याचा निर्णय करायला आपल्याला दिल्लीला जावं लागंत नाही, आपणच निर्णय घेतो, अशी जोरदार टोलेबाजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिवाजी चोथे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात अजित पवार यांनी राज्यातील सामाजिक वातावरण, मराठवाड्यातील पूर परिस्थिती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरही भाष्य केले. पण (BJP) भाजपा-शिवसेनेला त्यांनी लगावलेल्या या टोल्याची चर्चा कार्यक्रम स्थळी चांगलीच रंगली होती. शिवाजी चोथे एका हाडाचा कार्यकर्ता आहे. शिवसेना मराठवाड्यात वाढली तेव्हा मनापासून काम करणारे ते कार्यकर्ते आहेत.

Ajit Pawar- BJP News Chhatrapati Sambhajinagar
Ajit Pawar : गोव्यात अजित पवारांच्या विधानाने खळबळ, भाजप प्रदेशाध्यक्षांनीच थेट घाव घातला; म्हणाले, 'त्यांचे राजकीय अज्ञान'

1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले त्यावेळी शिवाजी चोथे आमदार होते. चाळीस वर्ष ज्या पक्षात काम केले, तो वाढवण्यासाठी जीवाचे रान केले तो सोडताना कंठ दाटून येणे सहाजिक आहे. पण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल शिवाजीराव तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. तुमच्यावर योग्य ती जबाबदारी दिली जाईल.

Ajit Pawar- BJP News Chhatrapati Sambhajinagar
NCP Sharad Pawar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात, महायुती सरकारला तळतळाट लागालय, लवकर शहाणे व्हावे!

गेल्या काळात आपल्याकडे सुरेश जेथलिया आले, आता शिवाजीराव आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते आले आहेत. मग आता उमेदवारी कोणाला मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण त्याची काळजी करू नका, आपल्याला उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय करायला दिल्लीला जावं लागंत नाही, आपला निर्णय आपण इथेच घेतो, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.

स्थानिक स्वराज्य निवडणुका महत्वाच्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आवाहन करतानाच ही सामान्य कार्यकर्त्यांची निवडणुक आहे. 2022 मध्ये ज्या निवडणुका व्हायला हव्या होत्या, त्या 2026 मध्ये होत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी कामाला लागा. नागपूरमध्ये आयोजित शिबिराला या, असे आवाहन अजित पवार यांनी केले. राज्यातील सामाजिक वातावरण चांगले राहावे, यासाठी कायद्याच्या चौकटीत सरकार निर्णय घेत असते. ते घेत असताना कुठल्याही जाती-धर्मावर अन्याय होणार नाही, याचा प्रयत्न राज्याचे प्रमुख घेतात, असेही अजित पवार म्हणाले.

प्रश्न 1: अजित पवारांनी भाजपाला कोणता टोला लगावला?
👉 त्यांनी "उमेदवार ठरवायला दिल्लीला जावं लागतं नाही" असा टोला लगावला.

प्रश्न 2: शिवाजी चोथे कोणत्या पक्षात दाखल झाले?
👉 ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले.

प्रश्न 3: या प्रवेशामुळे जालना जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.

प्रश्न 4: अजित पवारांचा टोला कोणत्या संदर्भात होता?
👉 भाजपच्या उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेवर.

प्रश्न 5: या घटनाक्रमाने कोणत्या पक्षाला धक्का बसू शकतो?
👉 महाविकास आघाडीतील घटक पक्षांना धक्का बसण्याची शक्यता व राष्ट्रवादीला बळ मिळण्याची चिन्हं आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com