Dharshiv News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ चांगलेच चर्चेत राहिले आहेत. कधी उमेदवारीहून नाराजीनाट्य तर कधी दावे- प्रतिदावे निमित्त ठरत आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या, महायुतीने प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव मतदारसंघाची चर्चा या ना त्या निमिताने होतच आहे.
ही जागा महायुतीत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) अजित पवार (Ajit pawar) गटाला मिळाली. धाराशिवच्या जागेवरून प्रचंड खल झाल्यानंतर आता ठाकरेंच्या ओमराजेंविरोधात अजितदादा आता कुणाला उतरवणार याविषयी चर्चांना उधाण आले होते.
एकीकडे उमेदवारांबाबतचा सस्पेन्स कायम असतानाच अचानक इच्छुक असलेल्या सुरेश बिराजदार यांना अजित पवारांनी त्यांना धाराशिवमधून तयारी करण्यासही सांगितले होते. मात्र, अचानक त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी धाराशिवमध्ये सभा घेतली. मात्र, या वेळी अजित पवार यांनी मी सुरेश बिराजदार यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना विधान परिषदेवर संधी देऊ, असा शब्द धाराशिवमध्ये सुरेश बिराजदार यांना दिला आहे. त्यामुळे या पवारांनी दिलेल्या आश्वासनामुळे बिराजदार यांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी धाराशिवमध्ये सभा घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची भेट घेतली. अजित पवार धाराशिवमधील पाटील यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. या वेळी त्यांनी विविध विषयावर चर्चा केली.
धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या सुरेश बिराजदार यांची नाराजी दूर करण्यासाठी पवार यांनी आमदारकीचे आश्वासन दिले आहे. लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदार यांचे नाव चर्चेत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांत मोठा जनसंपर्क निर्माण केलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध महायुती कोणाला उमेदवारी देणार ? याकडे सर्वांचे लक्ष होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली असून, यांच्यासमोर ठाकरेंचे शिवसैनिक ओमराजे निंबाळकर यांचे कडवे आव्हान आहे.
R