Harshvardhan Jadhav News : सगळे राजकीय पक्ष स्वार्थी, म्हणून महाराष्ट्र भिकारी झालायं..

BRS : जाधवांच्या घरात चाळीस वर्षांपासून आमदारकी आहे, पण आमचा साधा एक पेट्रोल पंप देखील होवू शकला नाही.
Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS News
Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS NewsSarkarnama

Marathwada Politics : मोठे राजकीय पक्ष, त्यांचे नेते हे कधीच जनतेच्या हिताचा विचार करत नाही, ते फक्त स्वतःच हित साधतात आणि म्हणूनच महाराष्ट्र भिकारी झालायं, अशा शब्दात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पक्ष बदलण्यावरून टीका करणाऱ्यांना सुनावले. जाधव यांनी नुकताच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला.

Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS News
Market Committee News : मराठवाड्यातील ५९ बाजार समित्यांसाठी आघाडी विरुद्ध सत्ताधारी सामना रंगणार..

जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयानंतर अनेकांनी त्यांना याबद्दल विचारले, सारखे पक्ष बदलण्यामागचे कारण काय? अशी विचारणा करणारे अनेक फोन त्यांना येत आहेत. (Marathwada) या संदर्भात एक व्हिडिओ जारी करत जाधव यांनीच यासंदर्भात खुलासा केला. ते म्हणाले, कुठल्याचा राजकीय पक्षाला सत्य बोलणारा व्यक्ती चालत नाही, मी नेहमी सत्य बोलतो हा माझा नाही तर इतरांचा प्राॅब्लेम आहे.

मी पक्ष का बदलतो हे विचारणाऱ्यांना माझे सांगणे आहे, की तुम्ही हेलिकाॅप्टर, विमान आणि महागड्या गाड्यांमधून फिरणाऱ्या नेत्यांच्या मागे का पळता? ते तुम्हाला आवडता म्हणून? की मग तुम्हाला त्यांच्या सारखं व्हायचय म्हणून? बरं तुम्ही हार घेवून स्वतःच्या मोटारसाकलवर त्यांच्या मागे फिरता, पण ते तुमच्या मागे ढुंकून देखील पाहत नाही.

सगळ्यांचे मेडिकल काॅलेज, महागड्या गाड्या असं व्यवस्थीत सुरू आहे. सगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हे स्वार्थी आणि स्वतःचाच विचार करणारे असल्यामुळे महाराष्ट्र आज भिकारी झालायं. तुमच्या पायात घालायला फाटकी चप्पल उरलेली नाही ही अवस्था आहे. मग अशावेळी एखाद्या राज्यात प्रामाणिकपणे काम करणारा नेता असेल आणि त्याच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर बिघडलं कुठे.

जाधवांच्या घरात चाळीस वर्षांपासून आमदारकी आहे, पण आमचा साधा एक पेट्रोल पंप देखील होवू शकला नाही, कारण आम्ही सातत्याने जनतेचा विचार केला, त्यांची कामे केली. त्यामुळे यांच्या नादाला न लागता काम करणाऱ्यांच्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहा. नुसतेच काय ते डोंगर, हाॅटेल करत बसू नका, असा टोला देखील त्यांनी टीका करणाऱ्यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com