Chhatrapati Sambhajinagar : अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर माजी मंत्री नवाब मलिक वैद्यकीय कारणांसाठी सध्या बाहेर आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचे अजित पवार गटासह शरद पवार गटातील नेत्यांनीही भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यांनी मात्र आपण नेमके कोणाच्या राष्ट्रवादीसोबत आहोत, याबाबत गोलमोलच उत्तरे दिली.
आता मात्र ते कोणासोबत आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी टायमिंग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
नवाब मलिक Nawab Malik यांनी नुकत्याचा झालेल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी तयार केलेल्या पोस्टरवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ ठळकपणे वापरले आहे. यातून त्यांनी आपण कोणासोबत आहोत, हे दाखवून दिले.
यावरुन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मलिक यांच्या शुभेच्छाचा पोस्टरचा दाखला देत दानवे यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
नवाब मलिकांनी आपल्या नावासह 'घड्याळ' लावून ते कोणासोबत आहेत हे जगजाहीर केलं. 'दाऊदसोबत बसणाऱ्यासोबत आम्ही राहू शकत नाही'.. असे घसा कोरडा पडेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे ओरडत होते. दुसरीकडे सुपर सीएम फडणवीस यांनी आपलं 'तत्व' सांगायला पत्ररुपी स्वस्त पब्लिसिटीचा आधार घेतला होता, याची आठवण दानवेंनी करून दिली.
आज मलिकांनी घड्याळ चिन्ह दाखवून मुख्यमंत्र्यांचा आणि फडणवीस यांचे 'सो कॉल्ड' तत्त्व केरात घातले आहे. यावर हे दोघे बोलले नाही, तर ते जनतेकडून 'खोटारड्यांचे मुकुटमणी' म्हणवले जातील, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये नबाव मलिक मंत्री होते. त्यावरून तत्काळीन विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर ते दाऊदच्या हस्तकांसोबत बसतात, मांडीला मांडी लावून बसतात, असा हल्ला चढवला होता.
अंबादास दानवे Ambadas Danve यांनी नवाब मलिक कोणासोबत आहेत? हे स्पष्ट केल्यानंतर महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जुन्या आरोपांची आठवण करून देत त्याच शब्दात फडणवीसांना चिमटा काढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.