Ambadas Danve : कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंग यांना भाजपनेच पद्मविभूषण दिल्याचा लाड यांना विसर पडला का?

Ambadas Danve on Prasad Lad : इतर नेते वगळता सपा खासदारांच्या पायात बूट होते. यावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे ट्विट केले होते. त्याला विधान परिषदेची विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज उत्तर दिले.
Ambadas Danve, Prasad Lad
Ambadas Danve, Prasad LadSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मुंबई भेटीत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीला भेट दिली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला गेला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे, असे म्हणत शंकराचार्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यामध्ये खडाजंगी सुरू झाली आहे.

अयोध्येचे समाजवादी पक्षाचे खासदार नुकतेच मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन त्यांना भेटले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी इतर नेते वगळता सपा खासदारांच्या पायात बूट होते. यावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे ट्विट केले होते. त्याला विधान परिषदेची विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज उत्तर दिले.

अयोध्येत कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणारे मुलायम सिंग यांना तुमच्याच पक्षाच्या सरकारने मरणोपांत पद्मविभूषण पुरस्कार दिला होता, याची आठवण अंबादास दानवे यांनी लाड यांना करून दिली. प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या ट्विटने दानवेंनी कारसेवकांवर गोळीबार करणारे तत्कालीन समाजवादी पक्षाचे नेते भाजपच्याही निशाण्यावर होतेच. पण भाजपने मुलायमसिंग यांना 2023 साली मरणोपरांत पद्मविभूषण प्रदान केला. हे तुम्हाला तुमच्या पक्षाकडून सांगण्यात आले नाही बहुदा, अशा शब्दात दानवे यांनी लाड यांना सुनावले.

Ambadas Danve, Prasad Lad
Dnyanraj Chougule : उमरगा मतदारसंघावर भाजपने ठोकला दावा, प्रदेशाध्यक्षांकडे केली मागणी

अयोध्येचे खासदार उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर या भेटीचा आणि त्यात या खासदारांच्या पायात बूट असल्याचा उल्लेख करत लाड यांनी ठाकरेंच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थितीत केला होता. हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट आणि बाबरी पतनावेळी कारसेवकांवर गोळीबार केल्याबद्दल सपा पक्षावर नेहमीच टीका केली होती

Ambadas Danve, Prasad Lad
MP Vasatrao Chavan News : आमदार जितेश अंतापूरकरांवर कारवाईची खासदार वसंत चव्हाणांनी 'का' केली मागणी !

आता समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा भाग आहे, ज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), एनसीपी (शरदचंद्र पवार), काँग्रेस आणि इतरांचा समावेश आहे. शनिवारी सपा खासदाराने ठाकरे कुटुंबियांच्या निवासस्थानी मातोश्रीला भेट दिली! यावेळी हे खासदार पादत्राणे घालून वंदनीय बाळासाहेबांच्या फोटोजवळ गेले. राजकारण किती विचित्र बनवते, उबाठा शिवसेनेच्या नेतृत्वाची लाज वाटते, अशी टीका लाड यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com