Ambadas Danve On Shinde Sena : आमची शिवसेना बाळासाहेबांची, तुमच्या सेनेचा माय-बाप कोण ?

Chhatrapati Sambhajinagar : शिंदे यांच्या शिवसेनेचा जन्म अनौरस, त्यांना वर्धापनदिन दिन साजरा करण्याचा अधिकारी नाही.
Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Ambadas Danve- CM Eknath Shinde NewsSarkarnama

Shivsena v/s Shivsena : आमच्या शिवसेनेला माय-बाप आहे, आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली आहे. (Ambadas Danve On Shinde Sena) तुमच्या सेनेचा माय-बाप कोण आहे? भाजपच्या मदतीने पक्ष फोडून तयार केलेली तुमची शिवसेना आहे, निवडणूक आयोगाच्या मदतीने मिळालेली तुमची शिवसेना आहे. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलेली शिवसेनाच खरी शिवसेना आहे.

Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Shivsena (UT) Anniversary News : आता जिंकेपर्यंत लढायचं, ठाकरे गटाची `शिवगर्जना` मोहिम...

त्यामुळे (Shivsena) शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्याचा तुम्हाला कोणाताही अधिकार नाही, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे (Eknath Shinde) गटावर केला. छत्रपती संभाजीनगर शिवसेना शाखेचा वर्धापनदिन साजरा करण्याची तयारी शिंदे गटाकडून देखील सुरू आहे. याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

अंबादास दानवे म्हणाले, शिंदे यांच्या शिवसेनेचा जन्म अनौरस असून, पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांना व त्यांच्या पक्षाला शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकारी नाही. (Marathwada) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून नेमले आहे, त्यांच्याकडेच नेतृत्व दिले आहे.

बाळासाहेबांनी नेमलेले नेतृत्व न मानणाऱ्यांना वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिंदे यांच्या शिवसेनेचा जन्म अनौरस आहे. लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळणार का? या प्रश्नावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवार ठरवतात, जो उमेदवार देतील त्यांचे काम सर्वजण करतील. उमेदवारी मागण्याची पध्दत शिवसेनेत नाही, असेही दानवे म्हणाले.

महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करताना अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्याचे पाप राज्य सरकारने केले आहे. सावरकर यांच्या पुतळ्यासोबत दोन्हीही पुतळे राहू दिले असते तर बिघडले नसते. पुतळे हटवल्याच्या प्रकाराबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही. या प्रकरणात सरकारने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com