Latur Loksabha Constituency : बाभळगावच्या बंगल्यात काँग्रेसची आकडेमोड, अमित देशमुख-काळेगेंचा 'Confidence' वाढला!

Amit Deshmumh and Latur Congress : ...त्यामुळे भाजपची हॅट्रीक हुकते की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
Latur Loksabha Constituency
Latur Loksabha ConstituencySarkarnama

Loksabha Election Latur News : लोकसभेच्या लातूर मतदारसंघात 2019 च्या तुलनेत मतांचा टक्का घसरला असला तरी महाविकास आघाडीचा काॅन्फीडन्स मात्र वाढल्याचे दसित आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. विजय काळगे यांच्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरलेल्या माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील बंगल्यावर बुधवारी काँग्रेस-महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत मांडण्यात आलेल्या आकडेमोडीनंतर अमित देशमुख(Amit Deshmukh) आणि उमेदवार विजय काळगे यांच्या चेहऱ्यावरचे हसू बरच काही सांगून जाणारे आहे. गेल्या दोन टर्मपासून पराभव पाहणाऱ्या काँग्रेसने यावेळी मात्र निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने लढल्याचे स्पष्टपणे दिसून आले. उमेदवार निवडीपासून ते मतदानाच्या दिवसापर्यंतची संपूर्ण जबाबदारी काँग्रेस श्रेष्ठींनी अमित-धिरज या आमदार भावांवर टाकली. त्यांना काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भक्कम साथ शेवटच्या टप्प्यात मिळाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदानाचा टक्का घसरला असला तरी त्याची चिंता काँग्रेसला(Congress ) नसल्याचे नेत्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोलीवरून जाणवत होते. मतदारांचे आभार मानल्यानंतर अमित देशमुख यांनी उमेदवार विजय काळगे व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाभळगाव येथील बंगल्यावर बोलावून घेतले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रनिहाय माहिती घेतली. ज्यांच्यावर बुथची जबाबदारी सोपवली होती त्यांच्याशी चर्चा करून आढावा घेतल्यानंतर अमित देशमुख आणि काळगे अगदी प्रसन्न मुडमध्ये दिसले.

आकडेमोडीनंतर देशमुख यांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे भाजपच्या(BJP) गोटामध्ये मात्र मतदानानंतर शांतता दिसत आहे. सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही मतदानानंतर कुठलेही भाष्य केलेले नाही, की समाज माध्यमातून संवाद साधला नाही. यावरून घसरलेल्या मतदानाचा फटका भाजपच्या श्रृंगारे यांना बसतो की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीने सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतली होती. त्या तुलनेत महायुतीला खूप उशीर लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा हीच श्रृंगारे यांच्यासाठी आशा असल्याचे बोलले जाते. एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाढता आत्मविश्वास तर भाजपच्या गोटात शांतता असे चित्र सध्या लातूरात दिसत आहे. त्यामुळे भाजपची हॅट्रीक हुकते की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीने लातूरात महायुतीला रोखले तर अमित देशमुख यांचे नेतृत्व मराठवाड्यात सर्वमान्य होईल, अशीही चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com