Beed Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर; अमित देशमुखांनी घेतला बीडचा आढावा

Amit Deshmukh News: अमित देशमुख यांनी रविवारी काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली
Amit Deshmukh News
Amit Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News: आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसही कामाला लागली असून मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यास काँग्रेसने सुरवात केली आहे.

काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या उपस्थितीत रविवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी बीड लोकसभेसह विधानसभेच्या सर्वच जागा पक्षाने लढवाव्यात, असा पदाधिकाऱ्यांचा सूर निघाल्याचे अमित देशमुखांनी सांगितले. तर येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमित देशमुखांनीही पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला.

या बैठकीनंतर अमित देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीक करत "देशात 'एनडीए'ला 'इंडिया' आघाडी सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे", असे म्हटले. "सोनीया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह आदी नेते आघाडीचे नेतृत्व करत असून देशात काँग्रेसला मिळणाऱ्या पाठींब्याचा फायदा राज्यात व जिल्ह्यात महाविकास आघाडीला होणार आहे", असेही देशमुख यांनी सांगितले.

Amit Deshmukh News
Prakash Ambedkar On Amit Shah: अमित शाहांच्या बुद्धीची कीव येते; प्रकाश आंबेडकरांची भाजपसह 'आरएसएस'वर टीका

यावेळी माजी मंत्री अशोक पाटील, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार सिराजोद्दीन देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव रवींद्र दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राहूल सोनवणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

"१९९९ पासून आघाड्याच्या राजकारणामुळे जिल्ह्यात काँग्रेसवर अन्याय झाला. आघाडीचा धर्म पाळत पक्षाने हा अन्याय सहन केला. पण आता नव्या राजकीय समिकरणामुळे काँग्रेसला लढण्याची संधी निर्माण झाली आहे.

लोकसभेसह जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढण्यास पदाधिकारी उत्सुक आहेत. याबाबतचा अहवाल आपण पक्षाला देणार असून यासाठी काही नावेही पुढे येतील", असेही देशमुख यांनी सांगितले.

Amit Deshmukh News
Mahamandal Expansion: महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?; अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदे गटाला बसणार फटका

"काँग्रेसला देशात मिळणाऱ्या पाठींब्याचा महाराष्ट्रात व जिल्ह्यातही महाविकास आघाडीला फायदा होईल. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अलिकडे छेद दिला जात आहे", असे म्हणत राज्यातील राजकीय समीकरणासंदर्भात देशमुखांनी टोला लगावला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com