Amit Deshmukh News : `लाडकी बहीण` राहुल गांधींच्या `गॅरंटी कार्ड` मधील योजना!

Amit Deshmukh says, Ladaki Bahin Yojana belongs to Congress : ही योजना काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या गॅरंटी कार्ड मधील आहे. अशा अनेक योजना ज्या मुळात काँग्रेस पक्षाच्याच आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजना प्रभावीपणे राबवल्या जातील.
MLA Amit Deshmukh News
MLA Amit Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur Congress News : राज्यात सध्या `लाडकी बहीण` योजनेचा बोलबाला सुरू आहे. महायुती सरकारला ही योजना तारणारी वाटते, तर विरोधी महाविकास आघाडीला या योजनेचे धड कौतुकही करता येत नाहीये अन् उघडपणे विरोधही. सुरवातीला या योजनेवर टीका केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता भूमिका बदलत आमची सत्ता आल्यानंतर ही योजना अधिक प्रभावीपणे राबवू, असे म्हणायला सुरवात केली आहे.

लातूर शहरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी तर `लाडकी बहीण` योजनाच मुळात काँग्रेसची असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील गॅंरटी कार्डच्या धरतीवर महायुतीने नाव बदलून `लाडकी बहीण` योजना आणल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाभळगाव येथील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना अमित देशमुख यांनी महायुतीला लोकसभेतील पराभवानंतर लाडकी बहीण आठवल्याचा टोला लगावला.

बाभळगावच्या पारंपारिक दसरा महोत्सवात माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्यासह अमित देशमुख सहभागी झाले होते. मिरवणुकीने ग्रामदैवतांचे दर्शन घेत परंपरेने मिळालेला लोकसेवेचा वारसा मागच्या अनेक वर्षापासून सातत्याने जपण्याचा प्रयत्न केला आहे. बाभळगाव पंचक्रोशीतील सर्व गावासोबतच लातूर शहर व जिल्ह्यातील जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी मागच्या पाच वर्षात अनेक योजना राबवल्या आहेत.

MLA Amit Deshmukh News
Amit Deshmukh News : अमित देशमुखांनी कोणाला काढायला सांगितले औसा ते मुंबईचे तिकिट?

जनतेचा पाठिंबा आणि आशीर्वादाच्या जोरावर जनसेवेचा हा यज्ञ पुढे चालूच राहील, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला. (Latur) तसेच राज्यातील महायुती सरकार आणि निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या त्यांच्या योजनावर अमित देशमुख यांनी टीका केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपाला जनतेने नाकारल्यानंतर महायुतीला लाडकी बहीण आठवली आहे.

वास्तविक पाहता ही योजना काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या गॅरंटी कार्ड मधील आहे. अशा अनेक योजना आहेत ज्या मुळात काँग्रेस पक्षाच्याच आहेत. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या जातील, असा जनतेमध्ये विश्वास आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात परिवर्तन घडणार आणि महाविकास आघाडी सत्तेत येणार, असा दावा अमित देशमुख यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com