Latur Congress News : अमित, धीरज देशमुख यांनी पक्षनिरीक्षकांसमोर दिली उमेदवारीसाठी मुलाखत

Amit, Dheeraj Deshmukh gave an interview for candidacy : लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अमित देशमुख हे सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत. तर त्याआधी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी याच मतदारसंघातून सहावेळा निवडणूक लढवत पाच वेळा विजय मिळवला होता.
Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh
Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur Congress News : लातूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी नुकत्याच मुलाखती पार पडल्या. काँग्रेस पक्षाने पाठवलेले पक्षनिरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मुलाखतीत लातूर शहरचे विद्यमान आमदार माजी मंत्री अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार धीरज देशमुख या दोघांनीही पक्षशिस्त पाळत मुलाखती दिल्या. तसेच या दोन्ही मतदारसंघातून लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अमित आणि धीरज देशमुख यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पक्षनिरीक्षांकडे केली.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अमित देशमुख (Amit Deshmukh) हे सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत. तर त्याआधी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी याच मतदारसंघातून सहावेळा निवडणूक लढवत पाच वेळा विजय मिळवला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख चौथ्यांदा लातूर शहरमधून निवडणूक रिंगणात असणार आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांचे बंधू विद्यमान आमदार धीरज देशमुख हे करत आहेत. ते या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत.

लातूर शहर आणि ग्रामीण या दोन्ही मतदारसंघावर काँग्रेसची सुरवातीपासून पकड राहिली आहे. हमखास निवडून येणाऱ्या जागा म्हणून या दोन्ही मतदारसंघाकडे पाहिले जाते. लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये काँग्रेसने मिळवलेला विजय पक्षासाठी उर्जा देणारा ठरला आहे. डाॅ. शिवाजी काळगे यांना निवडून आणण्यात देशमुख बंधू आणि त्यांचे काका दिलीपराव देशमुख व संपुर्ण कुटुंबाचा मोठा वाटा होता.

Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh
Amit Deshmukh News : अमित देशमुखांनी कोणाला काढायला सांगितले औसा ते मुंबईचे तिकिट?

अमित देशमुख यांच्याकडे लातूरसह नांदेड, जालना लोकसभा मतदारसंघाची देखील जबाबदारी होती. लोकसभेला या तीनही जागा निवडून आल्यामुळे शंभर टक्के रिझल्ट देणारा नेता म्हणून अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा राज्याच्या राजकारणात होत आहे. (Latur) लातूर जिल्हा पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला व्हावा, यासाठी काँग्रेसने अमित देशमुख यांच्यावर मोठी जबाबदारी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने टाकली आहे. आता स्वतःसह बंधू धीरज देशमुख यांना निवडून आणत लातूर जिल्ह्यात अधिकाधिक काँग्रेसच्या जागा जिंकण्याचे आव्हान असणार आहे.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे महायुतीने विधानसभेला हा डाग पुसण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर काल लातूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून मला तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार धीरज देशमुख यांना काँग्रेस पक्षाने पुन्हा उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh
Latur City Assembly Constituency 2024 : अमित देशमुखांना पुन्हा बाय ? की महायुती तगडा उमेदवार देणार

मतदारसंघातील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभारी आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार पक्षनिरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनर यांच्या उपस्थितीत लातूर काँग्रेस भवन येथे जिल्ह्यातील विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून पक्षशिस्तीप्रमाणे निरीक्षकांकडे रीतसर माझी मागणी नोंदवली.

जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या यावेळी मुलाखती घेतल्या. पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीर उभे राहून त्यांना निवडून आणावे, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे सहाही विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी लोकसभेप्रमाणे सर्वांनी एकजुटीने परिश्रम घ्यावेत, असेही देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com