Amit Shah Tour News : भाजपची सगळी तयारी वाया, अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा रद्द..

Marathwada News : राज्य व जिल्हा प्रशासनाने शाह यांचा दौरा जाहीर झाल्यापासून तयारी सुरू केली होती.
Amit Saha Nanded News
Amit Saha Nanded News Sarkarnama
Published on
Updated on

Aurangabad Political News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरात १६सप्टेंबर रोजी येणार होते. (Amit Saha News) परंतु त्याचा हा दौरा आता रद्द झाला आहे. अमित शाह यांच्या आगमनासाठी भाजपने जय्यत तयारी केली होती.

Amit Saha Nanded News
MP Imtiaz Jaleel Allegation : भुमरे, बंब, बोरनारे कंत्राटदारांकडून कमिशन खातात..

जिल्हा आणि राज्याचे प्रशासनही शाह यांच्या दौऱ्यासाठी सज्ज झाले होते. परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे शाह (Amit Saha) येणार नसल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृतपणे कळवण्यात आले आहे. (Marathwada) मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे यंदाचे वर्ष हे अमृत महोत्सवी असल्याने मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

१७ सप्टेंबर रोजीच्या ध्वजारोहणासह, उद्यापासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होणार आहे. (Aurangabad) या निमित्ताने १६ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात राज्य मंत्रीमंडळाची बैठक देखील सात वर्षांनी संभाजीनगरात होत आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पुर्वसंधेला आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती महत्वाची ठरणार होती.

राज्य व जिल्हा प्रशासनाने शाह यांचा दौरा जाहीर झाल्यापासून तयारी सुरू केली होती. याशिवाय पक्ष पातळीवर भाजपचे स्थानिक नेते, मंत्री, आमदार, खासदार हे देखील शाह यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. परंतु आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अमित शहा यांचा १६ सप्टेंबर रोजीचा नियोजित संभाजीनगर दौरा रद्द झाल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

भाजपच्या स्थानिक नेत्यांना देखील या संदर्भात कळवण्यात आले आहे. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनीही अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा रद्द झाल्याचे सांगितले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी हैदराबादेत होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अमित शाह हजर राहणार आहेत. यावेळी आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांचे मुख्यमंत्रीही या ध्वजारोहणाला उपस्थीत राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १७ सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे ध्वजारोहण केल्यानंतर लगेचच हैदराबादला रवाना होणार आहेत.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com