MLA Sanjay Shirsat : खैरे-दानवेंच्या वादात `उबाठा`मध्ये पुन्हा फूट..

MLA Sanjay Shirsat hits out at Uddhav Sena ahead of assembly elections : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सलग दुसऱ्यांदा झालेला पराभव, उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने आलेली उदासीनता आणि नेत्यांमधील बेबनाव याचा परिणाम होताना दिसतो आहे.
MLA Sanjay Shirsat News
MLA Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena V/S Shivsena News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे आमदार तथा राज्य प्रवक्ते संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दणका दिला. उबाठाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा काल मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेते प्रवेश झाला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात `उबाठा`ला फटका बसू शकतो.

तर दुसरीकडे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची बाजू भक्कम होताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अंतर्गत गटबाजी आणि दोन नेत्यांमधील वादाच्या झळा कायमच सर्वसामन्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना बसत आला आहे. पण याकडे या नेत्यांनी कधी लक्ष दिले नाही, की मुंबईतील नेत्यांनी. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात समेट घडवून आणण्यापेक्षा या दोघांना झुंजत ठेवण्यातच मुंबईतील काही नेत्यांना अधिक रस दाखवल्याचने बोलले जाते.

यात पक्षाचे मात्र मोठे नुकसान गेल्या कित्येक वर्षात झाले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील कन्नड वगळता सर्वच शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. पदाधिकारी आणि शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सलग दुसऱ्यांदा झालेला पराभव, उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने आलेली उदासीनता आणि नेत्यांमधील बेबनाव याचा परिणाम होताना दिसतो आहे.

MLA Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat : 'गांधींच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण दुर्दैवी'; आमदार शिरसाट यांची जहरी टीका

लोकसभेतील पराभवानंतर चंद्रकांत खैरे हे पक्षापासून दुरावत चालले आहेत. (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनीही आता जिल्ह्याची सगळी सुत्र अंबादास दानवे यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे दानवेंच्या कुठल्याही कार्यक्रम, आंदोलनाला खैरे समर्थक जात नाहीत. तर दानवेंकडूनही जिल्ह्यासह मराठवाड्यातील पाच जिल्ह्याची संघटनात्मक बांधणी स्वतंत्रपणे सुरू आहे. दरम्यान, दानवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी थोड्याफार अंतराने एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले.

आता विधानसभा निवडणुक महिनाभरावर आलेली असताना पुन्हा अंबादास दानवे यांच्या कोअर टीममधील पदाधिकाऱ्यासह विभागप्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह काही शिवसैनिकांनी `उबाठा`ला जय महाराष्ट्र केला. मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी `उबाठा` गटाचे शहर प्रमुख विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख संजय बारवाल, माजी नगरसेवक पुरुषोत्तम काळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर वाघचौरे, संतोष बोर्डे, विभागप्रमुख योगेश ठाकूर, संतोष बारवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

MLA Sanjay Shirsat News
Uddhav Thackeray: लढण्याचा निर्धार पक्का, उद्धव ठाकरेंचा विरोधक, मित्रांनाही इशारा

यावेळी त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची यावेळी उपस्थिती होती. याशिवाय काही माजी महापौर, नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी लवकरच शिवसनेत प्रवेश करतील, असा दावा जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com