ACB News : घरात बसून ऑनलाईन लाच घेतली; अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडलं

Vaijapur Bribe Case : वैजापूर येथील जलसंधारण उपविभागीय अधिकारी निखिल कवाडे याला फोन पेवर सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून रंगेहात पकडले.
ACB officials detain Water Conservation Sub-Divisional Officer Nikhil Kavade after he allegedly accepted a ₹7,000 bribe via PhonePe at his residence in Vaijapur.
ACB officials detain Water Conservation Sub-Divisional Officer Nikhil Kavade after he allegedly accepted a ₹7,000 bribe via PhonePe at his residence in Vaijapur.Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : वैजापूर येथील जलसंधारण उपविभागीय अधिकारी निखिल अशोक कवाडे याने आपल्या राहत्या घरी ऑनलाईन 7 हजार रुपयांची लाच घेतली. खाजगी वाहनाचे बिल तयार करण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजाराची लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कवाडे यांच्या घरी जाऊन कारवाई करत त्याला रंगेहात पकडले.

या प्रकरणातील तक्रारदार यांची टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी असून ते भाडेतत्त्वावर गाड्या देतात. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना ते वाहने पुरवतात. वैजापूर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांनाही संबंधित तक्रारदाराने बोलेरो ही गाडी मासिक भाडेतत्त्वावर दिली होती.

त्याचे बिल काढण्यासाठी तसेच एम बी बुक लॉग तयार करून तयार बिलावर सही करून घेण्यासाठी ते मुख्य कार्यालयात पाठविण्यासाठी निखिल कवाडे यांनी दहा हजार रुपयाची मागणी तक्रारदाराकडे केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला ही माहिती देत तक्रार नोंदवली.

ACB officials detain Water Conservation Sub-Divisional Officer Nikhil Kavade after he allegedly accepted a ₹7,000 bribe via PhonePe at his residence in Vaijapur.
Shaktipeeth Highway: "कितीही मोबदला दिला, तरी जमीन देणार नाही"; 'शक्तिपीठ'ला विरोध, महसूल मंत्र्यांसमोरच परभणीतील शेतकऱ्यांचा आक्रमक पावित्रा

अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने सापळा रचला. शनिवारी (ता.7) सुट्टी असताना कवाडे याने ऑनलाईन 7 हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि तो पथकाच्या सापळ्यात अडकला. लाच घेताच पथकाने निखिल कवाडे याला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल जप्त करत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com