Maharashtra : सतरावर्षांपुर्वी म्हणजेच २००६ मध्ये उघडकीस आलेल्या औरंगाबाद शास्त्रास्त्र साठा प्रकरणातील (Arms Stockpile Case News) आरोपी मुस्तफा सय्यद उर्फ मुन्ना मुस्तफा याला जमीन देण्यास विशेष कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आधी माफीचा साक्षीदार आणि नंतर फितूर झालेल्या मुस्तफाचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. पंधरा वर्षानंतर देखील त्याला जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
मुस्तफा सय्यद उर्फ मुन्ना मुस्तफा हा आधी माफीचा साक्षीदार झाला होता. (Aurangabad) मात्र त्यानंतर त्याला फितूर घोषित करण्यात आले म्हणून त्याचा खटला मूळ खटल्या पासून वेगळा करण्यात आला होता. (Marathwada) ऑक्टोबर २००७ पासून तो कोठडीत असून त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप खरे असल्याचे प्रथमदर्शनी जाणवत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
आरोपी निर्दोष असून जामिनावर सुटका झाल्यास तो पुन्हा गुन्हे करणार नाही असे दर्शवणाऱ्या कोणत्याही गोष्ठी समोर नाहीत, असे स्पष्ट करत आरोपीस जामीन नाकारण्यात आला आहे. मुस्तफा याच्यावर मोक्का आणि युएपीए अंतर्गत आरोप आहेत. (Maharashtra) औरंगाबाद येथील शस्त्रास्त्र प्रकरणात २०१६ साली विशेष न्यायालयाने १२ जणांना दोषी ठरवले होते. ज्यात २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी अबू जिंदाल आणि फैसल शेख यांचाही समावेश होता.
गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी ४३ किलो आरडीएक्स ,१६ ए के ४७ रायफल्स, ३२०० जिवंत काडतुस आणि ५० हॅण्ड ग्रेनेड पाकिस्तानातून तस्करी करून आणण्यात आले होते. राज्याच्या दहशतवादी पथकाने (एटीएस) ८ मे २००६ रोजी औरंगाबादजवळील चांदवड-मनमाड महामार्गावर तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यावेळी जुंदाल घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.
अखेरीस त्याला सौदी अरेबियातून हद्दपार केल्यानंतर २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती. एटीएसने खुलताबाद, येवला आणि मालेगाव येथून सहा एके-४७ रायफल, ३,२०० जिवंत काडतुसे, ४३ किलो आरडीएक्स आणि ५० हातबॉम्ब जप्त केले होते. हा शस्त्रसाठा मोठ्या दहशतवादी कटाचा भाग म्हणून राज्यात आणण्यात आला होता, असा एटीएसचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.