Cm Eknath Shinde-Uddhav Thackeray News Nanded
Cm Eknath Shinde-Uddhav Thackeray News NandedSarkarnama

Nanded : दोन्ही जिल्हाप्रमुख शिंदे गटात जाणार समजताच निघाले हकालपट्टीचे आदेश..

आज या दोघांनी खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. हे दोघेही उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. (Shivsena Nanded)
Published on

नांदेड : आमदार, खासदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही त्याच वाटेने निघाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नांदेड दौऱ्यावर आले असतांनाच शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटले. ते शिंदे सेनेसोबत जाणार याची कुणकूण लागातच लगोलग त्यांनी पक्षातून हकालपट्टी केल्याचे आदेश (Shivsena) शिवसेना कार्यालयातून काढण्यात आले आहेत.

इकडे हकालपट्टी आणि तिकडे पुन्हा शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आज सायंकाळी (Nanded) नांदेडमध्ये दाखल झाले. उद्या सकाळी त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर दुपारी ते हिंगोलीला देखील जाणार आहेत.

समर्थक आमदार, खासदारांना व पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सध्या राज्याचा दौरा करत आहेत, मराठवाड्यातील त्यांचा हा दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात देखील ते उद्धव सेनेला सुरूंग लावण्याचे काम करत आहेत. नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे आणि आनंदा बोंढारकर हे दोघेही मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाला जय महाराष्ट्र करणार आहेत.

Cm Eknath Shinde-Uddhav Thackeray News Nanded
Bjp : रावसाहेब दानवे म्हणतात लोकसभेसाठी मिशन ४५ नाही ४८..

आज या दोघांनी खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. हे दोघेही उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. महिनाभरापुर्वीच या दोघांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर, खासदार हेमंत पाटील शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे विरोधात आंदोलन करण्यात आले होते.

आता हेच दोघेजण शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दरम्यान, दोन्ही जिल्हाप्रमुखांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे समजताच शिवसेना भवनातून या दोघांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com