समर्थकाचा पराभव होताच सत्तार म्हणाले, दुध संघाची चौकशीच लावतो..

आपण कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, मी चौदा वर्षात कधी दूध संघाची गाडी देखील वापरली नाही. पारदर्शक कारभार केला म्हणूनच मतदारांनी पुन्हा आपल्याला अध्यक्षपदी बसवले. (Mla Haribhau Bagde)
Bagde-Bhumre-Sattar
Bagde-Bhumre-SattarSarkarnama

औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादस संघाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक गोकुळसिंग राजपूत यांचा पराभव झाला. (Shivsena) या पराभवाने सत्तार चांगलेच संतापले असून आपल्या विरोधात बागडे-काळे-भुमरे एकत्र आल्याचा आरोप करत आता दुध संघाची चौकशीच लावतो, असा इशारा दिला आहे. (Abdul Sattar) उपाध्यक्षपद आपल्या समर्थकाला मिळावे, यासाठी शिवसेनेचे दोन मंत्री भुमरे-सत्तार यांच्यात रस्सीखेच होती. (Haribhau Bagde)

बिनविरोध निवडीचे प्रयत्न झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली आणि यात भुमरे समर्थक निरफळ विजयी झाले. सत्तार समर्थकाचा पराभव झाल्याने ते चांगलेच भडकले आणि त्यांनी थेट दुध संघाची चौकशी लावण्याची धमकीच दिली. यावर नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कुठलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही, म्हणत सत्तार यांना आव्हान दिले आहे.

दुध संघाच्या अध्यक्षपदी आमदार हरिभाऊ बागडे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपाध्यक्ष देखील बिनविरोध व्हावा, यासाठी शिवसेना-भाजप, काॅंग्रेस या तीन्ही पक्षांनी प्रयत्न केले. काॅग्रेसचे बोरसे यांनी माघार देखील घेतली. मात्र उपाध्यक्षपदी आपल्याच समर्थकाची वर्णी लागावी म्हणून भुमरे-सत्तार अडून बसले.

बागडे यांच्यासह काॅंग्रेसने दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दोघे आपापल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे अखेर उपाध्यक्षपदासाठी मतदान झाले आणि त्यात भुमरे समर्थक निरफल विजयी झाले तर सत्तार समर्थक राजपूत यांचा पराभव झाला. समर्थकाचा पराभव सत्तार यांच्या जिव्हारी लागला, या उलट आपल्या विरोधात बागडे-काळे-भुमरे एकत्र आले, याचा त्यांना प्रचंड राग आला.

Bagde-Bhumre-Sattar
बागडेंचे अध्यक्षपद कायम, उपाध्यक्ष पदी मंत्री भुमरे समर्थकाची वर्णी; सत्तार तोंडघशी..

संतापाच्या भरात दूध संघाच्या कार्यालयातून बाहेर पडतांना सत्तार यांनी थेट आता दूध संघाच्या कारभाराची चौकशीच लावतो, अशी धमकी दिली. त्यामुळे भविष्यात दूध संघातील संचालक मंडळाला काम करणे अवघड जाणार असेच दिसते.

दरम्यान, सत्तार यांच्या चौकशीच्या धमकीवर अध्यक्ष बागडे यांनी आपण कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, मी चौदा वर्षात कधी दूध संघाची गाडी देखील वापरली नाही. पारदर्शक कारभार केला म्हणूनच मतदारांनी पुन्हा आपल्याला अध्यक्षपदी बसवले, असे म्हणत आव्हान दिले. अध्यक्षपदासाठी देखील मी सत्तार यांच्याकडे गेलो नव्हतो, असेही बागडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com