Asaduddin Owasi On Modi : मोदी सर्वात मोठे एक्टर, त्यांनी सगळ्यांची सुट्टी केली असती..

Marathwada : केरळा स्टोरीतून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे.
Asaduddin Owasi On Modi News
Asaduddin Owasi On Modi NewsSarkarnama
Published on
Updated on

Aimim : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे एक्टर आहेत. ते जर फिल्म इंडस्ट्रीत असले तर आताच्या सगळ्या कलाकारांची त्यांनी सुट्टी केली असती, अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. (Asaduddin Owasi On Modi) छत्रपती संभाजीगर येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

Asaduddin Owasi On Modi News
Pankaja Munde News : पाच वर्षांची चिमुकली पंकजा मुंडेंची जबरा फॅन ; थेट भेटायला परळीत..

आसाम हिंसाचारात होरपळतोय, पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्यात आमचे पाच जवान शहीद झाले, पण आमचे पंतप्रधान कर्नाटकात रोड शो करत आहेत. (Asaduddin Owasi) केरळा स्टोरी चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत, असा टोला देखील ओवेसी यांनी लगावला. जर्मनीमध्ये हिटलरने जे ज्यू लोकांसोबत केले तेच आपल्याकडेही सुरू आहे.

केरळा स्टोरीतून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. (PM Modi) चित्रपटात ३२ हजार मुलींचे धर्मांतर झाल्याचा दावा केला गेला, पण प्रकरण जेव्हा कोर्टात गेले तेव्हा हा आकडा फक्त पाचवर कसा आला? असा सवाल देखील ओवेसी यांनी उपस्थितीत केला. (Aimim) कर्नाटक राज्यातील निवडणूक, केरला स्टोरी हे विषय पंतप्रधानांना देशातील महत्वाच्या प्रश्नांपेक्षा जास्त जवळचे का वाटतात ?

मोदी हे एक चांगले कलाकार तर आहेच, पण त्यासोबतच ते चांगले निर्माते देखील असल्याची टीका ओवेसी यांनी केली. बीआरएस पक्षाची महाराष्ट्रात एन्ट्री झाली, तेलंगणातील हा पक्ष तुमचा मित्र आहे, यावर बोलतांना कुठलाही राजकीय पक्ष देशात जावून सभा घेवू शकतो, निवडणुका लढवू शकतो, असे म्हणत त्यांनी बीआरएसचे समर्थन केले. लवकरच एमआयएमची देखील शहरात सभा होणार असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com