राज ठाकरेंच्या सभेनंतर असदुद्दीन ओवेसींची मोठी घोषणा

Asaduddin owaisi| AIMIM| Raj Thackeray| BJP| भाजपनेच महाराष्ट्रात मुस्लिमांच्या विरोधात द्वेष सुरु केला
Asaduddin Owaisi Latest Marathi News, Asaduddin Owaisi News, Asaduddin Owaisi on Raj Thackeray
Asaduddin Owaisi Latest Marathi News, Asaduddin Owaisi News, Asaduddin Owaisi on Raj Thackeray
Published on
Updated on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये मोठी सभा झाली. या सभेतील भाषणात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय त्यांनी जोरकसपणे मांडला. यावेळी अजान सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चांगलेच भडकले. त्यांनी पोलिसांना आताच जाऊन ही बांग बंद करा, त्यांच्या तोंडात बोळा कोंबा नाहीतर त्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) जे होईल ते मला माहित नाही, असे म्हणत थेट इशाराच दिला. (Asaduddin Owaisi Latest Marathi News)

दरम्यान, नांदेड येथे एमआएमतर्फे आयोजित ईफ्तार पार्टीत एमआयएमचे अध्यक्ष तसेच खासदार असदुद्दीन ओवेसींनी (Asduddin Owaisi ) विरोधकांवर निशाणा साधला. ''भाजपनेच महाराष्ट्रात मुस्लिमांच्या विरोधात द्वेष सुरु केला. भाजपकडूनच आज सर्वात जास्त हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण सुरु आहे. राज्यात जे काही चाललंय आम्ही पाहत आहोत. महाराष्ट्रात संविधानाच्या विरोधात बोलले जाते. राजकीय स्पर्धा सुरु आहे, असे सागंत आता राज ठाकरेंप्रमाणे महाराष्ट्रभर घेणार सभा असल्याची घोषणा असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

Asaduddin Owaisi Latest Marathi News, Asaduddin Owaisi News, Asaduddin Owaisi on Raj Thackeray
राज ठाकरेंच्या सभेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर; प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची होणार धरपकड?

महाराष्ट्रात सुरु असलेल्या भोंग्याविषयी राज ठाकरे जे बोलत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भावांचे भांडण आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारा, मी द्वेषाचे राजकारण करत नाही,पण ज्या प्रमाणे राज ठाकरे यांनी सभा घेतल्या त्याच प्रमाणे आता आम्हीही औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, परळी यासह महाराष्ट्रभर सभा घेणार आहोत, अशी घोषणा असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

तसेच, देशात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी,समाजवादी पार्टी यांची स्वतःला हिंदुत्ववादी ठरवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. त्यात काँग्रेस व आप हे पक्ष काय दुधाने धुतलेले नाहीत. ज्या प्रमाणे देशात समान नागरी कायदा बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याच पद्धतीने देशात दारू बंदीदेखील व्हायला हवी, सगळ्यांचे उत्पन्न समानअसायला हवं, या गोष्टीही होणे गरजेचे असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.

राज्यातील भोंग्यांचा मुद्दा म्हणजे मुस्लिम विरोधात षडयंत्र आहे. पण आम्ही कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. आम्ही निवडणूकीतून शिवसेनेचा पराभव केला याचं संजय राऊत दुःख आहे. त्यामुळे ते आम्हाला बी टीम म्हणून आमच्यावर राग काढत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com