Ashok Chavan News : 'काँग्रेससह विरोधकांना कोणत्याच निवडणुकीत यापुढे निवडून देऊ नका..'अशोक चव्हाणांनी टाकली महिलांवर जबाबदारी

BJP Congress News: नांदेडमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यावेळी म्हणाले, काँग्रेस व इतर विरोधी पक्ष यांना जिल्हा परिषद असो की अन्य कोणतीही निवडणूक, यापुढे ते निवडून येणार नाही, याची जबाबदारी आता महिलांनीच घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
MP Ashok Chavan
MP Ashok Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : महिलांना 14 टक्के राजकीय आरक्षण मिळायला 67 वर्ष लागली. केंद्रातील मोदी सरकारने पन्नास टक्के आरक्षण देण्यासाठी संसदेत बील आणले. पण काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षांनी ते मंजूर होऊ दिले नाही. दोन तृतीयांश बहुमत नसताना सरकारने हे बिल आणले, कारण महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण मिळणार होते, त्यामुळे विरोधक या बिलाला साथ देतील, असा आम्हाला विश्वास होता. पण त्यांनी हे बिल रोखून देशातील महिलांवर अन्याय केला, अशी टीका खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

नांदेडमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यावेळी म्हणाले, काँग्रेस व इतर विरोधी पक्ष यांना जिल्हा परिषद असो की अन्य कोणतीही निवडणूक, यापुढे ते निवडून येणार नाही, याची जबाबदारी आता महिलांनीच घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेस पक्ष आणि अन्य विरोधकांमुळेच आज देशातील महिला राजकीय आरक्षणापासून वंचित राहिल्या आहेत. या बीलाच्या विरोधात काँग्रेसने उलटसुलट बोंबा मारल्या. दक्षिणेतील लोकसभेच्या जागा कमी होणार, असे सांगत त्यांनी खोटी माहिती सांगितल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.

प्रत्यक्षात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी कुठल्याही राज्यातील जागा कमी होणार नाही, सरसकट सगळ्या राज्यांमध्ये पन्नास टक्के जागा वाढवून देण्याचे आश्वासन संसदेत दिले होते. पण महिलांना आरक्षण मिळू नये, त्यांना राजकारणात प्रतिनिधित्व करता येऊ नये, यासाठी काँग्रेससह विरोधकांनी महिला आरक्षण बिल पास होऊ दिले नाही. ते पास झाले असते तर लोकसभेत 272 महिला खासदार झाल्या असत्या.

MP Ashok Chavan
Nasrapur Girl Death: चिमुरडीचा मृतदेह रस्त्यावर ठेवत नातेवाईकांचा आक्रोश, चार तास महामार्ग रोखला; सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

आता ज्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणाला विरोध केला, बिलाच्या विरोधात मतदान केले, त्यांना निवडणुकीत पाडण्याची जबाबदारी माझ्या महिला भगिनींनी घेतली पाहिजे. कोणतीही निवडणुक असो, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा तिथे काँग्रेससह विरोधकांचा पराभव करा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com