

Pune News : पुणेे शहरातील वडगाव येथील नवले ब्रिजवर नसरापूर येथील अत्याचार व हत्या झालेल्या चिमुरडीच्या नातेवाईकांनी तीव्र आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनानंतर या प्रकरणाच्या वेगवान तपासासाठी विशेष यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयात पीडितेची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त केले जातील, असं आश्वासन देण्यात आलं आहे.
नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. सायंकाळी मृतदेह घरी आणल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मुंबई–बेंगळुरू महामार्गावरील वडगाव पुलावर रास्ता रोको आंदोलन छेडले. आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सुमारे साडेचार तास आंदोलन सुरू होते.
या दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुलीचे वडील व नातेवाईकांशी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लेखी आश्वासन देण्याची मागणी कायम ठेवत आंदोलक ठाम राहिल्याने तातडीने तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर सरकारच्या स्तरावरून पुन्हा चर्चा सुरू करण्यात आली.
प्रकरणाचा तपास वेगाने आणि काटेकोरपणे करण्यासाठी विशेष यंत्रणा स्थापन केली जाईल, तसेच न्यायप्रक्रियेत कोणतीही ढिलाई होऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. नातेवाईकांनी या प्रकरणाचा निकाल दोन महिन्यांत लागावा, अशी मागणी केली; मात्र न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून असल्याने त्याबाबत ठोस कालमर्यादा देण्यात आलेली नाही.
नसरापूर येथील चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. गेल्या चार ते साडेचार तासांपासून नवले पुलावर चिमुरडीचे प्रेत ठेवण्यात मुंबई -बंगळूरू महामार्ग अडवण्यात आला होता.
आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी मुंबई- बंगळुरू महामार्गावरच सुरू केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे गेल्या अडीच तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहेत. याचदरम्यान या आंदोलन स्थळी आता पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हेही दाखल झाले आहेत. त्यांनीही पीडितेच्या कुटुंबाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण नातेवाईकांनी त्यांच्यासमोरही तीव्र रोष व्यक्त केला.
नवले पुलावर या चिमुरडीचे प्रेत ठेवण्यात आले असून तिला न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करत आंदोलकांची धरपकड सुरू केली.
पुणे पोलिसांनी अखेर नवले ब्रिज येथे ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना हटवलं. यावेळी पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यानंतर आंदोलकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. त्यामुळे काहीवेळ येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. अखेर चार तासांनंतर मुंबई-बंगळूरु महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात पोलिसांना यश आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.