Nanded Loksabha By-Election : बाहेरच्यांना नांदेड पोरका वाटतो, पण अजून मी जिवंत आहे : अशोक चव्हाण

Ashok Chavan Speech : नांदेडमध्ये अजूनही स्वाभिमानी लोक आहेत; अशोक चव्हाण
File Photo of PM Narendra Modi and Ashok Chavan
File Photo of PM Narendra Modi and Ashok Chavan
Published on
Updated on

उमरी : नांदेड जिल्हात एकेकाळी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचे काम अशोक चव्हाण यांनी केले, हे विसरून चालणार नाही. बाहेरून येणाऱ्या मंडळींची भाषा घसरली आहे. आमचा नांदेड जिल्हा तुम्हाला पोरका वाटला काय? अशोक चव्हाण अजून जिवंत आहे. अजूनही नांदेडमध्ये स्वाभिमानी लोक आहेत, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केली.

उमरी येथे लोकसभेचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ही निवडणूक आमच्या स्वाभिमानाची आहे. आम्ही भाजप मध्ये आहोत, प्रामाणिकपणे पक्षाचे काम करतो. जिल्ह्यातील महायुतीच्या जागा नायगावसह निवडून आणू. विकासाची चालना देणारा आमदार व खासदार कसा असावा, लोकसभेला संतुकराव हंबर्डे उमेदवार आहेत, आम्ही-तुम्ही मिळून संतुकरावांना लिड देऊन दिल्लीला पाठवू. देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. सत्तेमधील खासदार आपला पाहिजे, असेही ते म्हणाले.

क्रॉस मतदान करण्याच्या भानगडीत पडू नका, यामुळे पक्षाचे नुकसान होईल. लाडक्या बहिणीला आता १५०० रुपये दिले. पुढे २१०० रुपये महिना चालू होईल. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार भाव देत आहोत. कवळे गुरुजी चिंता करू नका, तुम्हाला राजकीय भविष्य आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

यावेळी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी, राजेश कुंटूरकर, भाऊसाहेब गोरठेकर, राजेश कुंटूरकर, वसंत सुगावे, सुनील हंबर्डे, संजय कुलकर्णी, विक्रम देशमुख, अमोल ढगे, संजीव विठ्ठलराव सवई, सुभाष पेरेवार, विजयकुमार उत्तरवार, श्रीनिवास अनंतवार, बाबू नाईक, महमद खाज्जा, बापूसाहेब कौडगावकर, किशोर पबितवार, मनोहर पवार, प्रणिता जोशी, राजेश मनुरकर, ज्ञानेश्वर सावंत, अविनाश कदम, गजानन पाटील उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com