Monsoon Session News : अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते होते, पण त्यांनीच समर्थक आमदारांसोबत भाजपच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. (Ashok Chavan News) त्यामुळे पावसाळी अधिवेशन हे विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याशिवाय होत आहे. काॅंग्रेसने या पदावर दावा सांगितला असला तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. संख्याबळाचा विचार केला, तर दोन्ही सभागृहांमध्ये काॅंग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, असे बोलले जाते.
विरोधी पक्षनेता अद्याप ठरला नसला तरी माजी मुख्यमंत्री व (Congress) काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सध्या सभागृहात विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत वावरतांना दिसत आहेत. शेतकरी, बेरोजगारी, उद्योग, रेल्वे विकास अशा सगळ्याच प्रश्नांवर चव्हाण (Ashok Chavan) सभागृहात आक्रमक होत भूमिका मांडत आहेत. त्यामुळे काॅंग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरला की काय? अशी चर्चा होत आहे.
आधी डबल इंजिन आणि आता ट्रिपल इंजिनचे सरकार, गतीमान सरकार अशी जाहीरतबाजी सरकारकडून केली जाते. (Marathwada) त्यावरच चव्हाणांनी हल्ला चढवला. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नानावर चर्चा करत असतांना चव्हाण यांनी ट्रिपल इंजिनचे सरकार मराठवाड्यात स्लो का होते? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
लातूर-नांदेड थेट रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाबाबत लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनं दिली. मात्र, अद्याप या प्रकल्पाचा साधा प्रस्ताव देखील केंद्राकडे पाठवलेला नाही. राज्यात ट्रिपल इंजीनचं सरकार आहे. हिरवी झेंडी दाखवण्यासाठी गार्डच्या रूपात मराठवाड्याचेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आहेत. तरीही मराठवाडा आला की ट्रिपल इंजीन 'स्लो' का होतं ? असा सवाल करतांनाच हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन असे सगळेच प्रश्न रखडलेले आहेत? याकडे देखील चव्हाण यांनी लक्ष वेधले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.