Ashok Chavan News : पटोलेंच्या दणक्याने अशोक चव्हाण घायाळ, समर्थक नगरसेवकांच्या हकालपट्टीवर संतापले

Ashok Chavan in trouble in Nanded due to the innings of Nana Patole : या कारवाईनंतर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी या संदर्भात छेडले तेव्हा नाना पटोले यांना आपण मोजत नाही, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम हे गद्दार आहेत, असे म्हणत संताप व्यक्त केला.
Nana Patole Ashok Chavan
Nana Patole Ashok Chavan sarkarnama
Published on
Updated on

लक्ष्मीकांत मुळे

Nanded Congress-BJP Politics News : अर्धापूर नगरपंचायतीतील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवंकावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांनी कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील आपल्या समर्थकांवर कारवाईचा वरंवटा फिरल्याने अशोक चव्हाण घायाळ झाले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या अर्धापूरात काँग्रेसने अशोक चव्हाण समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवत कोंडी केली आहे.

या कारवाईनंतर भाजपचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना पत्रकारांनी या संदर्भात छेडले तेव्हा नाना पटोले यांना आपण मोजत नाही, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम हे गद्दार आहेत, असे म्हणत संताप व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस म्हणजे मी या भ्रमात असलेल्या अशोक चव्हाण यांच्या भ्रमाचा भोपळा लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात काँग्रेसच्या निष्ठावंतांनी फोडला.

अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलेल्या वसंतराव चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाल्याने अशोक चव्हाण यांना धक्का बसला. भाजपमध्ये प्रेवश केल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत अपयश आल्याने चव्हाण यांचे केंद्रातील संभाव्य मंत्रीपद हुकले, अशीही चर्चा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात होती. विधानसभा निवडणुकीत लोकसभेची कसर भरून काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या अशोक चव्हाण यांच्या काँग्रेसमधील समर्थकांना दणका देत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चव्हाण यांना घायाळ केले आहे.

Nana Patole Ashok Chavan
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांना कुटुंबातूनच मोठा धक्का; सात महिन्यातच मेहुणे खतगावकरांनी साथ सोडली

अर्धापूर नगरपंचायतीतील नगराध्यक्ष, उपनगराध्यांसह दहा नगरसेवक काँग्रेसमध्ये राहिले असते तर अशोक चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी मदत झाली असती. (Nana Patole) लोकसभा निवडणुकीत या सर्वांनी पक्षाच्या विरोधात भाजपचा प्रचार केल्याचा अहवाल जिल्हाध्यक्ष कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता. त्यानंतर कारवाईचे अधिकार देत पटोले यांनी कदम यांच्यामार्फतच संबंधित नगरसेवकांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली.

नांदेड जिल्ह्यातील पुर्वी काँग्रेसकडे असलेल्या तीन विधानसभेच्या जागा भाजपकडे खेचून आणण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न आहे. स्वतःच्या हक्काच्या भोकर मतदारसंघात कन्या श्रीजया हिला निवडून आणण्यात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशावेळी काँग्रेसमधील समर्थकांची थेट पक्षातून हकालपट्टी झाल्याने अशोक चव्हाण यांना धक्का बसला.

Nana Patole Ashok Chavan
Nana Patole : 'MVA'ची जागा वाटपाची फायनल तारीख ठरली; नाना पटोलेंनी मॅरेथॉन बैठकांचा विषय सांगितला

यातूनच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मी त्यांना मोजत नाही म्हणत टीका केली. तर काँग्रेससोबत एकनिष्ठ असलेल्या जिल्हाध्यक्ष कदम यांनाच गद्दार ठरवत संताप व्यक्त केला. आता काँग्रेसने हकालपट्टी केलेल्या या नगरसवेकांना अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश देतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com