Ashok Chavan : संक्रांतीच्या दिवशी अशोक चव्हाण राजकीय नेत्यांना काय म्हणाले?

Makar Sankrant : अशोक चव्हाणांनी पतंगबाजीचा आनंद घेताना केले महत्त्वाचे आवाहन
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded News :

प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले-वाईट प्रसंग येत असतात. अशावेळी आपल्या कटू बोलण्याने अनेकजण दुखावलेही जातात. विशेषतः राजकारणात अलीकडच्या काळात कटूता खूप वाढली आहे. मकर संक्रातींच्या निमित्ताने राजकारणातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगणे आहे की, तिळगुळ घ्या, अन् आयुष्यभर गोडगोड बोला..!

याला आवाहन म्हणा किंवा संदेश... मात्र, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी या हटके शुभेच्छा दिल्या आहेत, एवढे खरे. त्याचवेळी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने राजकारणातील कटुता नाहीसी व्हावी, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली.

Ashok Chavan
Gulabrao Patil : शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजपला चिमटा; 'श्रीरामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करू नका...'

अशोक चव्हाण यांनी संक्रातीनिमित्त आज नांदेडमध्ये (Nanded) पतंगबाजीचा आनंद लुटला. यावेळी बच्चे कंपनीला चॉकलेट आणि तिळगुळाचे वाटप करत त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

'शब्द हे बाणासारखे असतात, ते एकदा बाहेर पडले की परत घेता येत नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना घडतात. मकरसंक्रांतीला आपण सगळेच तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणतो, आज याची खरेच गरज आहे. विशेषतः राजकारणात वाढलेली कटुता कमी करण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे', असे अशोक चव्हाण म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'या निमित्ताने माझे सगळ्याच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना नम्र आवाहन आहे की, मनातली कटुता नाहीसी करून प्रत्येकाने मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ घ्यावे आणि केवळ आजच नाही, तर एकमेकांशी आयुष्यभर गोडगोड बोलावे', असे आवाहनही अशोक चव्हाण यांनी केले.

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला मणिपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अशोक चव्हाण यांच्यावर या निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. अशावेळी त्यांनी राजकारणातील कटुता नाहीसी करण्यासाठी आवाहन करत पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Avinash Chandane)

Ashok Chavan
Raju Shetty : सरकार शेतकऱ्यांचे खुनी...! राजू शेट्टी कडाडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com