Nanded News : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आगमी लोकसभा निवडणुक पुन्हा नांदेडमधून लढण्याची दाट शक्यता आहे. (Ashok Chavan News) त्या दृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केली असून आज नांदेड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक त्यांनी घेतली. उद्या देखील या बैठका सुरू राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
काॅंग्रेसमधील ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना पक्ष लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचे समजते. (Ashok Chavan) अशोक चव्हाण २०१४ मध्ये सर्वप्रथम (Nanded) नांदेडमधून लोकसभा लढले होते. विशेष म्हणजे देशात मोदी लाट असतांना त्यांनी ही जागा जिंकली होती. २०१९ मध्ये पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली, पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात झाले आणि त्याचा फटाक अशोक चव्हाणांना बसला. त्यामुळे भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमधून विजयी झाले होते.
त्यानंतर अशोक चव्हाण यांनी पुन्हा विधानसभा लढवली आणि ते जिंकले. शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील नाट्यमयरित्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यात चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. (Marathwada) अडीच वर्षांनी पुन्हा सरकार बदलले आणि ते आता विरोधकांच्या भूमिकेत आहेत. नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्यातील विजयामुळे काॅंग्रेसला सध्या दहा हत्तींचे बळ आले आहे.
अगदी ठाकरेंचे विद्यमान खासदार जे शिंदे गटात गेले आहेत, त्या जांगावर देखील काॅंग्रेस दावा सांगण्याच्या तयारीत आहेत. अशोक चव्हाण यांनी नुकताच कर्नाटकचा दौरा करून मुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या इतर मंत्र्यांची भेट घेवून चर्चा केली होती. त्यानंतर राज्यात परतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात व मराठवाड्यात बैठकाचा धडाका सुरू केला आहे.
ज्या पद्धतीने चव्हाण कामाला लागले आहेत, ते पाहता काॅंग्रेस पुन्हा त्यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून उतरवण्याच्या तयारी असल्याचे संकेत मिळत आहे. चव्हाण यांची देखील लोकसभा लढवण्याची मानसिकता झाल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तर चव्हाण यांच्या कन्या सुजया या विधानसभेच्या उमेदवार असू शकतात. लोकसभेला पराभव झाला तर अशोक चव्हाण पुन्हा विधानसभेला नशीब आजमावतील असे देखील बोलले जात आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.