Ashok Chavan On Karnataka Result : `भारत जोडो` यात्रेचा इम्पॅक्ट कर्नाटक निवडणुकीत दिसला..

Congress : आपल्या विरोधातील सरकारे फोडाफोडीचे राजकारण करून बदलण्याचे प्रकार गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटकात झाले. जे लोकांना आवडले नाही.
Ashok Chavan  News, Maharashtra
Ashok Chavan News, MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कन्याकुमारी ते कश्मिर या साडेतीन हजार किलोमीटरच्या भारत जोडो (Bharat Jodo Rally) यात्रेचा परिणाम कर्नाटक राज्यातील निवडणुकीत दिसून आला. भाजपने धार्मिक प्रचाराला महत्व दिले, तर काॅंग्रसेने बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, राज्याच्या विकासाच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. त्याचा हा परिणाम असून लोक धार्मिक प्रचाराला एकदा-दोनदा बळी पडतात, सातत्याने तोच प्रकार झाला तर त्याला जनता नाकारते हे या निकालावरून स्पष्ट झाले, अशा शब्दात काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी कर्नाटकातील विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

Ashok Chavan  News, Maharashtra
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवणार? डीके शिवकुमारांवर जबाबदारी....

सुडाचे राजकारण राहूल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय, त्यांना बेघर करण्यात आले या गोष्टी लोकांना आवडल्या नाहीत, त्याचा परिणाम देखील कर्नाटकच्या निवडणुकीत दिसून आला, असा दावा देखील अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला. अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, भाजपच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आणि कुडाच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत.

महागाई, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, सुरक्षा या विषयावर कर्नाटकातील जनतेने मतदान केले आहे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात महिलांच्या प्रश्नांनाना प्राधान्य दिले होते. (Karnataka Assembly Election) महिलांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास, आर्थिक दुर्बल महिलांना दरमहा मदत, बेरोजगार तरुणांना भत्ता हे विषय आम्ही वर्षभरात सोडवण्याचे आश्वासन दिले होते. याचा परिणाम महिलांच्या मतांचे प्रमाण वाढवण्यावर झाला. या उलट भाजपने बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा, केरळ स्टोरी चित्रपटावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या मुद्यांना प्राधान्य दिले. जे लोकांना आवडले नाही.

लोकशाही पद्धतीने निवडून दिलेली आपल्या विरोधातील सरकारे फोडाफोडीचे राजकारण करून बदलण्याचे प्रकार गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटकात झाले. जे लोकांना आवडले नाही. या सगळ्यांचा परिणाम म्हणून कर्नाटकच्या निकालाकडे पाहिले पाहिजे. अर्थात भाजप यातून किती बोध घेईल हे सांगता येत नाही, असा टोला देखील अशोक चव्हाण यांनी लगावला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक राज्यातील निर्णय स्थानिक नेतृत्वाला घेवू द्यावेत, त्यात केंद्रातील नेत्यांनी हस्तक्षेप करू नये असे मत व्यक्त केले होते.

यावर विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले, स्थानिक नेतृत्वाने योग्य निर्णय घेतले, त्यांचे चांगले रिझल्ट मिळाले तर केंद्रातीन नेतृत्वाला हस्तक्षेप करण्याची गरज पडत नाही. जेव्हा स्थानिक नेतृत्व कुठेतरी कमी पडते तेव्हाच केंद्रातील नेतृत्व हस्तक्षेप करत असते, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांचा मुद्दा खोडून काढला. कर्नाटक राज्यातील निकाल हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील परिवर्तनाचा पाया असल्याचेही चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com