Ashok Chavan News : नांदेडमध्ये बडे नेते भिडले; 'काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही! अशोक चव्हाण यांचा चिखलीकरांना टोला..

Ashok Chavan V/S Pratap Patil Chikhlikar : नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रताप पाटील चिखलीकर हे सातत्याने अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.
Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan Political Clash  News
Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan Political Clash NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या टीकेला अशोक चव्हाण यांनी थेट उत्तर देत “माझं नाव घेतल्याशिवाय काहींना जेवण जात नाही” असा जोरदार टोला लगावला.

  2. नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात शब्दयुद्ध पेटले आहे.

  3. अशोक चव्हाणांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले असून त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Nanded Mahayuti Clash News : एकमेकांची उणीदुनी काढण्याचे प्रकार नांदेड जिल्ह्याला नवीन नाहीत. निवडणुकीच्या काळात तर या प्रकारांना ऊत येतो. काही लोकांना तर माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, अशा शब्दात खासदार अशोक चव्हाण यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना टोला लगावला.

नांदेड जिल्हा हा महाराष्ट्रातील टॉप टेन जिल्ह्यांमध्ये असला पाहिजे ही माझी भावना आहे आणि त्यासाठीच मी काम करतो. त्यामुळे अशा प्रकारांना मी महत्त्व देत नाही आणि त्याने मला काही फरकही पडत नाही, असे सांगत चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्यावर पलटवार केला. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रताप पाटील चिखलीकर हे सातत्याने अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

राक्षस, रावण त्यांचे दहन करा, रावण, राक्षस कोण? हे नांदेडच्या जनतेला चांगलंच माहित आहे. तुम्ही लातूरच्या देशमुखांची बरोबरी कधी करू शकणार नाहीत, मांजरा साखर समूहाने 3150 रूपये भाव ऊस उत्पादकांना जाहीर केला आहे. तुम्ही 3151 रुपये जाहीर करून दाखवा, असे आव्हान देत चिखलीकरांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर तोंडसुख घेतले होते. गेल्या आठवड्यात ऊस उत्पादकांना भाव जाहीर करण्याच्या दिलेल्या चिखलीकर यांच्या आव्हानावर अशोक चव्हाण यांनी 'आधी कलंबर साखर कारखाना सुरू करून दाखवा म्हणाव', अशा अगदी मोजक्या शब्दात चिखलीकर यांच्या टीकेची खिल्ली उडवली होती.

त्यानंतर सातत्याने चिखलीकारांकडून अशोक चव्हाण यांना टार्गेट केले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. एकमेकांचे पारंपारिक विरोधक असलेले मात्र सध्या महायुती म्हणून मित्रपक्ष असलेले हे जिल्ह्यातील दोन प्रमुख नेतेच भांडू लागल्याने निवडणुकीत नेमकं काय घडणार? याचा अंदाज नांदेडकरांना येऊ लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा करण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांनी कंबर कसली आहे. गेल्या सहा महिन्यात काँग्रेसच्या अनेक माजी आमदारांना पक्षात प्रवेश देत त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडी केल्याचे दिसून आले. अशोक चव्हाण यांची वाटचाल मात्र 'आस्ते कदम' सुरू आहे. राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांचा राजकीय अनुभव मोठा असल्याने प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कुठल्याही टीकेला फारसं महत्त्व न देण्याची त्यांची भूमिका आहे.

खऱ्याला खोटं म्हणण्याचा कार्यक्रम..

एका जाहीर कार्यक्रमात मात्र आज अशोक चव्हाण यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. चिखलीकर यांचे नाव न घेता 'माझे नाव घेतल्याशिवाय काही लोकांना जेवण जात नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे'. येणाऱ्या निवडणुकीच्या काळात असे प्रकार आणखी वाढतील. मात्र याने आपल्याला काहीही फरक पडत नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि महाराष्ट्राच्या टॉप टेन यादीमध्ये समावेश हे आपले उद्दिष्ट असून खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं म्हणणाऱ्यांच्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका.

एकमेकांची उणीदूनी काढून काहीही साध्य होणार नाही, असे सांगत अशोक चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आपण फार गांभीर्याने घेणार नाही हे स्पष्ट केले. महायुतीतील नांदेड मधल्या या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्यामुळे याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बसू नये, याची खबरदारी राज्यातील वरिष्ठ नेते घेतील आणि दोघांनाही योग्य सल्ला लवकरच देतील, असे बोलले जाते.

FAQs

Q1. प्रताप पाटील चिखलीकरांनी नेमकी कोणती टीका केली होती?
➡️ चिखलीकरांनी अशोक चव्हाणांच्या राजकीय भूमिकेवर आणि कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते.

Q2. अशोक चव्हाणांनी काय उत्तर दिलं?
➡️ चव्हाण म्हणाले, “माझं नाव घेतल्याशिवाय काहीजणांना जेवणच जात नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

Q3. ही घटना कुठे घडली?
➡️ नांदेड जिल्ह्यातील एका पत्रकार परिषदेत किंवा सभेत हे वक्तव्य करण्यात आले.

Q4. सोशल मीडियावर या वक्तव्याची प्रतिक्रिया कशी आहे?
➡️ व्हिडिओ व्हायरल झाला असून समर्थक आणि विरोधक यांच्यात तीव्र चर्चा सुरू आहे.

Q5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ नांदेडमधील राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com